Sri lanka President Gotabaya Rajapaksa
Sri lanka President Gotabaya Rajapaksa  Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानांची नियुक्ती आठवडाभरात होणार : राजपक्षे

दैनिक गोमन्तक

Srilanka Crisis: श्रीलंकेतील पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी शुक्रवारी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. आर्थिक संकट आणि निदर्शना दरम्यान देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी ट्विट केले आहे. देशातील अराजकता रोखण्यासाठी आणि रखडलेला राज्याचा कारभार चालू ठेवण्यासाठी नवीन सरकार स्थापनेसाठी लवकरात लवकर पावले उचलली जातील, असे गोटबाया यांनी सांगितले. (Srilanka new Government)

ते म्हणाले की, श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानांची नियुक्ती आठवडाभरात केली जाईल. नव्या सरकारला नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी देऊन देशाला पुढे नेण्याचे अधिकार दिले जातील, याशिवाय, संसदेला अधिक सशक्त बनवण्यासाठी 91व्या घटनादुरुस्तीतील मजकूर पुन्हा अंमलात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यासाठी पावले उचलली जातील.

कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्याच्या विविध गटांकडून आलेल्या आवाहनांचा विचार केला जाईल. नवीन सरकार आणि देशात स्थैर्य आणण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, आम्हाला यावर चर्चा करण्याची आणि एकमताच्या दिशेने काम करण्याची संधी मिळेल, असे गोटाबाया राजपक्षे म्हणाले.

महिंदा राजपक्षेंनी कुटुंबासह केले स्थलांतर

पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला सोडून संपूर्ण कुटुंबासह नौदल तळावर गेले. कोलंबोमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. मात्र, राजीनाम्यानंतरही आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेचा रोष कमी झाला नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान आपल्या संपूर्ण कुटुंबासह कोलंबोतील संतप्त आंदोलकांपासून जीव वाचवून बचावले.

दरम्यान श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मंगळवारी लोकांना सहकारी नागरिकांविरुद्ध "हिंसा आणि सूड" थांबविण्याचे आवाहन केले आणि देशासमोरील राजकीय आणि आर्थिक संकटाशी सामना करण्याचा संकल्प व्यक्त केला. यापूर्वी राष्ट्रपतींचे मोठे बंधू आणि माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांना नौदल तळावर पाठवण्यात आले होते. त्यांच्या समर्थकांवर लागोपाठ हल्ले झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT