<div class="paragraphs"><p>Facebook &amp; Twitter</p></div>

Facebook & Twitter

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

चीनने इंटरनेटला बनवले युद्धभूमी; लोकशाहीवादी देशांना धोका !

दैनिक गोमन्तक

आपल्या आक्रमकतेमुळे आणि विस्तारवादी विचारसरणीमुळे जगभरात धोकादायक आव्हान म्हणून समोर आलेला चीन आता पारंपरिक युद्धाऐवजी आभासी युद्ध लढत आहे. विशेष म्हणजे या युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. गेल्या आठ वर्षांपासून चीनची कम्युनिस्ट पार्टी लोकांची मते जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर केवळ प्रचारच करत नाही, तर रणांगण बनवून आपली विचारधारा लोकांवर लादण्यातही गुंतलेली आहे. विशेष म्हणजे, चीनला (China) समर्थन देणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फक्त चिनी लोकांवर बंदी आहे.

दरम्यान, कागदपत्रांवरुन असे समोर आले आहे की, चिनी अधिकारी आपल्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी विशेष साहित्य तयार करत आहेत. त्याचबरोबर फॉलोअर्स वाढवण्यासाठी, फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर टीकाकारांचा मागोवा घेण्यासाठी आणि इतर डेटा मिळविण्यासाठी खाजगी कंपन्यांचा वापरही वाढला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड 2013 पासून सुरु झाला आहे. जेव्हा चीनने 2013 मध्ये राष्ट्रीय प्रोपेगैंडा आणि विचारधारा या विषयावर परिषद घेतली होती.

परिषदे दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी घोषणा केली की, येत्या काही दिवसांत इंटरनेट हे युध्दाचे मैदान असेल आणि या युद्धात लोकांची मते जाणून घेण्यासाठी युद्ध होईल. शी यांनी इंटरनेट सुरक्षा आणि माहिती-आधारित अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी एक केंद्रीय गट तयार केला असून सायबरस्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना (CAC) ची पुनर्रचनाही केली आहे. विशेष म्हणजे सायबर स्पेसमध्ये चीन जे काही करत आहे, त्यामागे शी यांची उपस्थिती थेट आहे.

पब्लिक ओपिनियन मॅनेजमेंटच्या नावाने चाललेला अपप्रचार

चीन सरकारने प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढली होती. शांघाय आणि बीजिंग शहराच्या पोलीस विभागाने जारी केलेल्या या निविदांमध्ये आंतरराष्ट्रीय तांत्रिक कंपन्यांना 'पब्लिक ओपिनियन मॅनेजमेंट'चे कंत्राट देण्यात आले आहे. निविदा जिंकलेल्या कंपनीने चीन सरकारच्या या खेळाचा भांडाफोड केला आहे. विजेत्या कंपनीच्या वतीने, यूएस मधील अनेक मीडिया गटांना मूळ कागदपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये सोशल मीडियावरील त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी चिनी सरकारने किती काम केले आहे हे निर्धारित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT