Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'पाकिस्तानची लवकरच फाळणी होणार'; तालिबनी नेत्याचा दावा

दैनिक गोमन्तक

तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) चे कठपुतळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनलशी बोलताना तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले की, ''इम्रान सरकार (Imran Khan) राष्ट्रवादी अफगाण लोकांना इस्लामिक अमिरातीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्यांचा एक उद्देश आहे. पाकिस्तानचे (Pakistan) लवकरच विघटन होईल.'' (A Taliban Spokesman Also Said That Pakistan Would Soon Disintegrate)

दरम्यान, सुरुवातीला पाकिस्तान आणि तालिबान (Taliban) यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. परंतु आता दोघांमधील संबंध बिघडत चाललंय, असं दिसतंय. त्याच वेळी, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद युसूफ यांनी अलीकडेच काबुलमध्ये (Kabul) इस्लामाबादविरोधी मोठ्या निदर्शनाच्या योजनांमुळे त्यांचा अफगाणिस्तानचा प्रस्तावित दौरा रद्द केला. सीमेवर कुंपण घालण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी युसूफ मंगळवारी अफगाणिस्तानला आंतर-मंत्रालयीन पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होते. यासोबतच तालिबान राजवटीसोबतच्या चर्चेदरम्यान अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मानवतावादी गरजांचा आढावा घेणार होते.

NRF अजूनही युद्ध लढतयं

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येऊन पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु नॅशनल रेझिस्टन्स फोर्स (NRF) अजूनही तालिबानी सैनिकांशी युद्ध करत आहे. एनआरएफ अतिरेक्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे. NRF ने एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आत्ता गप्प बसू नये. तसेच आणखी एका ऑडिओ संदेशात, NRF नेते अहमद मसूद यांनी स्पष्ट केले की, आमचा संघर्ष कोणत्याही विशिष्ट वांशिक गटासाठी किंवा भूभागासाठी नाही तर अफगाणिस्तानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे.

NRF टँकविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राने सुसज्ज

सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही फोटोवरुन असे सूचित होत आहे की, NRF सैनिकांकडे आता तालिबानची वाहने नष्ट करण्यासाठी अँटी-टँक गाइडेड मिसाइल (ATGM) आहेत. क्षेपणास्त्रांमध्ये प्रगत टार्गेटिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी लक्ष्यापर्यंत पोहोचेपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करते, असेही अहवालात म्हटले आहे. तालिबान सत्तेवर येण्यापूर्वीच राष्ट्रीय प्रतिकार दलाने त्याविरोधात आघाडी उघडली होती. पंजशीर व्हॅली हे NRF चे क्षेत्र असायचे, जिथे त्याची पकड मजबूत होती. पण तालिबानने हळूहळू इथेही आपले स्थान निर्माण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

SCROLL FOR NEXT