Raghav Chadha
Raghav Chadha Dainik Gomantak
देश

Raghav Chadha आता 'मिशन गुजरात' वर, भाजपच्या बालेकिल्ल्यात AAP ला मिळवून देणार यश

दैनिक गोमन्तक

Gujarat Assembly Election 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय निश्चित करणारे युवा नेते आणि खासदार राघव चढ्ढा आता गुजरातमध्ये भाजपचा खेळ बिघडवतील. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी AAP ने राघव चढ्ढा यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. राघव चढ्ढा यांच्या मेहनतीचे फळ पंजाबमध्ये आपच्या विजयात मिळाले. 'आप' ने 117 पैकी 92 जागा जिंकून राज्यात 79 टक्के बहुमत मिळवले होते. याच कारणामुळे 'आप'ने राघव चढ्ढा यांच्यावर गुजरात निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

राघव चढ्ढा यांच्याकडे गुजरातमध्ये मोठी जबाबदारी

राघव चढ्ढा यांनी दिल्ली आणि पंजाब (Punjab) या दोन्ही ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पक्ष त्यांच्याकडे तरुणांमध्ये एक अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणून पाहतो, ज्यांना ते चांगले शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधींसह चांगल्या भविष्याची आश्वासने देत आहेत. 'आप'च्या राष्ट्रीय आकांक्षा साकार करण्यासाठी गुजरातमधील (Gujarat) विजय महत्त्वाचा आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्याचे अनेक दौरेही केले आहेत.

आप भाजपला टक्कर देतोय

'आप' ने गुजरातमध्ये सत्तेवर आल्यानंतर सर्वांना नोकऱ्या, मोफत वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, 'आप'ने गावांच्या प्रमुखांसाठी निश्चित पगारही जाहीर केला आहे. केजरीवाल 'आप'ला भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून प्रोजेक्ट करत आहेत.

काँग्रेसला अपमानित करण्याचा प्रयत्न

नुकत्याच झालेल्या गुजरात दौऱ्यावर अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, 'असे लोक आहेत, ज्यांना राज्यात भाजपची सत्ता नको आहे आणि काँग्रेसला मत द्यायला आवडत नाही. त्यांची मते आम्हाला मिळवायची आहेत, कारण राज्यात भाजपला आम्हीच पर्याय आहोत.'

दुसरीकडे, काँग्रेसवर टीका करताना केजरीवाल म्हणाले होते की, 'भाजपसाठी काँग्रेस हा बहुधा सर्वात सोयीचा विरोधक आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राज्यातील 182 जागांपैकी 77 जागा जिंकत काँग्रेसने भाजपला कडवे आव्हान दिले होते. शेवटी मात्र, गुजरातमध्ये भाजपने 99 जागा जिंकून सरकार स्थापन केले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT