KTR Vs Rahul Gandhi:
KTR Vs Rahul Gandhi: Dainik Gomantak
देश

KTR Vs Rahul Gandhi: अमेठीचा गड राखता आला नाही, आणि चालले पंतप्रधान बनायला...

गोमन्तक डिजिटल टीम

KTR Vs Rahul Gandhi: जे स्वतः अमेठीचा गड राखू शकले नाहीत तेच पंतप्रधान बनायला चालले आहेत, अशी टीका पुर्वाश्रमीचा तेलंगण राष्ट्र समिती (TRS) आणि सध्याचा भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि तेलंगणातील मंत्री के. टी. रामा राव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर केली. या 'आंतरराष्ट्रीय' नेत्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून द्यावे, म्हणून काळजी घ्यायला हवी, असा टोलाही त्यांनी राहुल यांना लगावला आहे.

राहुल गांधी यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या महत्वाकांक्षेवरून उपहासात्मक टीका केली होती. केसीआर यांनी काही दिवसांपुर्वीच तेलंगण राष्ट्र समिती हे पक्षाचे नाव बदलून ते भारत राष्ट्र समिती केले आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले होते की, जर तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना ते एक राष्ट्रीय पक्ष चालवत आहेत, असे वाटत असेल तर ते ठिकच आहेच. काही अडचण नाही. ते तसे मानू शकतात. ते तर हे देखील मान्य करू शकतात की ते एक ग्लोबल पक्ष चालवत आहेत.

याशिवाय आगामी 2024 च्या लोकसभेसाठी काँग्रेस आणि केसीआर यांचा पक्ष एकत्र येऊ शकतात का, असे विचारल्यावर अशी कोणतीही शक्यता नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले होते. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने तेलंगणात आहेत. या यात्रेतून ते 12 राज्यांमध्ये प्रवास करणार आहेत. केरळ, कर्नाटक या राज्यातून ही यात्रा आता तेलंगणात आली आहे. दररोज 25 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी या यात्रेतून करत आहेत.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर के. टी. रामाराव यांनी ट्विटटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केटीआर हे तेलंगणचे नगरविकास आणि वाणिज्य मंत्री आहेत. ते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्रदेखील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

SCROLL FOR NEXT