sonia gandhi
sonia gandhi Dainik Gomantak
देश

सोनिया गांधींनी ईडीला केली विनंती, चौकशी दोन दिवसांनी पुढे ढकलावी

Manish Jadhav

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी दोन दिवसांनी पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालयाला केली आहे. सोनियांना गुरुवारी 23 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु प्रकृती स्वास्थाच्या कारणास्तव सोनिया यांना नुकतेच दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून त्यांना सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. काँग्रेसचे म्हणणे आहे की, डॉक्टरांनी त्यांना घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणी ईडीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाच दिवस चौकशी केली आहे. काल, मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल यांची 10 तासांपेक्षा अधिक तास चौकशी केली. गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडी अधिकाऱ्यांनी 52 वर्षीय राहुल यांची 30 तासांहून अधिक चौकशी केली होती, ज्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) त्याचे जबाब नोंदवण्यात आले होते.

दुसरीकडे, आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांना 'यंग इंडियन'ची स्थापना, 'नॅशनल हेराल्ड'चे ऑपरेशन आणि काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ला दिलेली कर्जे आणि निधी हस्तांतराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. मीडिया संस्थेत गेले आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांच्यासह काही इतर काँग्रेस (Congress) नेते 'यंग इंडियन'चे प्रवर्तक आणि भागधारक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Goa Today's Live News: 'रेड्या'च्या जत्रेसाठी माशेलहून जलमार्गे तरंगांचे मयेत आगमन

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

SCROLL FOR NEXT