Crime
Crime  Dainik Gomantak
देश

Karnataka: 'त्याला' करायचा होता सेक्स, पण महिलांच्या मृतदेहांचे नग्न फोटो काढून...

दैनिक गोमन्तक

Karnataka Shocking News: कर्नाटकातील मदिकेरी येथील एका धक्कादायक प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रुग्णालयातील शिपायाने केलेल्या घृणास्पद कृत्याचे प्रकरण चर्चेत आले आहे. आरोपी हा मदिकेरी शहरातील रुग्णालयात काम करायचा.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मदिकेरी जिल्हा रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या आरोपी सय्यदने शवागारात महिलांच्या मृतदेहांची नग्न फोटो क्लिक केले. मात्र, ही बाब उघडकीस आल्यापासून आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा (Accused) शोध सुरु केला आहे.

कोविड वॉरियरचे घृणास्पद कृत्य

आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपी सय्यद हा 'कोविड वॉरियर'म्हणून रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोना काळात आरोपीने जवळपास 300 मृतदेह शवागारात ठेवले होते. मात्र त्याचे घृणास्पद वास्तव आता समोर आले आहे. शवागारातील फोटो काढण्याच्या विरोधात एका हिंदू संघटनेने याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सय्यद फरार झाला. त्याचवेळी त्याने हॉस्पिटलच्या (Hospital) अधिकाऱ्यांकडे राजीनामाही सुपूर्द केला.

महिलांच्या नग्न मृतदेहांचे क्लिक केलेले फोटो

काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आरोपीने हॉस्पिटलच्या शवागारात सेक्स केला होता. हिंदू जागरण मंचने रुग्णालयाचे डीन डॉ. कर्यप्पा यांच्याकडे तक्रार केली की, शवागार अटेंडेंट सय्यद हुसैन याने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना शवागारात बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याशिवाय, सय्यद हुसेनवर शवागारात येणाऱ्या महिलांच्या मृतदेहांचे नग्न फोटो क्लिक केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या फोनमध्ये अनेक मृत महिलांचे न्यूड फोटो सापडले आहेत.

महिला कामगारांचा छळ करत असे

रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना शवागारात शरीरसंबंधासाठी येण्याचे निमंत्रण देणारे कॉल रेकॉर्डही आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याने शवागारातील अनेक मृत महिलांशी संबंध ठेवल्याचा संशय आहे. नुकतेच, आरोपी सय्यदने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्थानिकांनी आरोपीला हुसकावून लावले आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. ज्यानंतर सय्यदच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

SCROLL FOR NEXT