Rajpath
Rajpath Dainik Gomantak
देश

ऐतिहासिक राजपथ आता 'कर्तव्य पथ' म्हणून ओळखला जाणार, मोदी सरकार बदलणार नाव

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजपथाचे नाव आता 'कर्तव्य पथ' असणार आहे. मोदी सरकारने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे 'कर्तव्य पथ' असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन ( Raisina Hill) पर्यंतचा मार्ग 'राजपथ' म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी याच मार्गावर भव्य परेडचे आयोजन केले जाते. मध्य दिल्लीतील राजपथ हा हाय सिक्युरिटी झोन आहे. याआधी, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात, 2016 मध्ये, दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रेसकोर्स मार्गाचे नाव 'लोककल्याण मार्ग' असे करण्यात आले होते.

राजपथ मार्ग हा ब्रिटीश राजा जॉर्ज पंचम यांच्याशी संबंधित आहे. एवढेच नाही तर इंडिया गेटवर ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत, तिथे फार पूर्वी किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. विशेष म्हणजे, बोस यांनी राजा जॉर्ज पंचम विरुद्ध बंड केले होते. 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम दिल्ली भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ त्या काळात या रस्त्याला 'किंग्ज वे' असे नाव देण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतरच सेंट्रल व्हिस्टाचे नाव 'राजपथ' असे ठेवण्यात आले. त्याकडे जाणार्‍या एका रस्त्याला 'क्वीन्स-वे' असे नाव देण्यात आले, ज्याला तुम्ही आता 'जनपथ' म्हणून ओळखता.

पहिल्या अल्बुकर्क रोडचे नाव बदलले

राजधानीतील रस्त्यांच्या नामांतराच्या संदर्भात अल्बुकर्क रोडचे नाव बदलण्यात आले. महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ अल्बुकर्क रोडवरील बिर्ला हाऊसमध्ये घालवला, म्हणून त्यांच्या हत्येनंतर लगेचच या रस्त्याला '30 जानेवारी मार्ग' असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आठ वर्षांनी 1955 मध्ये 'किंग्स-वे राजपथ' आणि 'क्वीन्स-वे जनपथ' बनले. अंतरिम सरकार स्थापन झाल्यावर 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंना राहण्यासाठी बंगला मिळालेल्या यॉर्क रोडचे मोतीलाल नेहरु मार्ग असे नामकरण करण्यात आले. डॉ राजेंद्र प्रसाद क्वीन्स व्हिक्टोरिया रोडवरील एका बंगल्यात राहत होते, म्हणून रस्त्याला हे नाव पडले. देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचे निवासस्थान किंग एडवर्ड रोडवर होते, त्यानंतर त्यांच्या मृत्यूपश्चात त्याचे नाव 'मौलाना आझाद रोड' असे करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT