mithun chakraborty.jpg
mithun chakraborty.jpg 
देश

मिथुन चक्रवर्तीला 'मै कोब्रा हु्ॅं' म्हणनं भोवणार ? कोलकाता पोलीसांनी केली चौकशी

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेमध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मिथुन चक्रवर्ती (Mithun Chkraborty) अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता आहे. या प्रकरणाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांची पोलीसांनी चौकशी केली आहे. या वादग्रस्त विधानाबद्दल मानिकलता पोलीस (Police) स्टेशनमध्ये गुन्हादाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मिथुन चक्रवर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली होती. (Mithun Chakraborty was questioned by kolkata Police for making a controversial statement)

मिथुन चक्रवर्ती यांनी मार्च महिण्यात कोलकाता येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमुल कॉंग्रेस विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. या दरम्यानच ब्रिगेड ग्राऊंड येथील सभेत मिथुन चक्रवर्ती यांनी "मी एक नंबरचा कोब्रा आहे. डसलो तर तुम्ही थेट फोटोत दिसाल." तसेच पुढे ते असेही म्हणाले होते की, मला बंगाली असण्यावर गर्व आहे. मला माहिती आहे की, तुम्हाला माझ्या डायलॉग आवडतात." या प्रकरणाी मिथुन चक्रवर्ती यांची पोलीसांनी फोनवरुन चौकशी केली असल्याचे समजते आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने माठे प्रयत्न करुन देखील यश मिळु शकले नाही. या निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसला 200 पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. विशेष बाब हि आहे की, मिथुन चक्रवर्ती पुर्वी तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार देखील राहीले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT