<div class="paragraphs"><p>Food Corporation of India ready to meet food needs</p></div>

Food Corporation of India ready to meet food needs

 
देश

अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ सज्ज

pib

मुंबई: विविध सरकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या गहू खरेदीने यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 16 जून 2020 रोजी मध्यवर्ती साठ्यासाठी गव्हाची खरेदी 382 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली असून, तिने गेल्यावर्षीचा 381.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदीचा विक्रम मोडला आहे. संपूर्ण देश कोविड-19 मुळे लॉकडाऊनमध्ये असतांना ही विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.

ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लॉकडाऊनमुळे नियोजित काळापेक्षा एक पंधरवडा जास्त लागला. दरवर्षी एक एप्रिलपासून शेतकऱ्याकडे असलेल्या अतिरिक्त गव्हाची काह्रेडी सुरु होते, मात्र या वर्षी ती 15 एप्रिलपासून सुरु झाली. राज्य सरकारे आणि भारतीय अन्न महामंडळाच्या अखत्यारीतील इतर सर्व सरकारी खरेदी संस्थांनी विशेष प्रयत्न करुन    शेतकऱ्यांकडून ही खरेदी काहीही विलंब न होता केली जाईल, याची दक्षता घेतली.

केंद्र सरकारने, याआधी असलेल्या खरेदी केंद्रांची 14,838 ही संख्या 21,869 पर्यंत वाढवली आणि पारंपरिक बाजारपेठांसह, जिथे जिथे शक्य असेल,तिथे नवी खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली. यामुळे बाजारात शेतकरयांची होणारी गर्दी टाळता येऊन शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले. बाजारपेठांमधील रोजची गर्दी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन, शेतकऱ्याना टोकन देण्यात आले. यामुळे, तसेच, सॅनिटायझरचा वापर, प्रत्येक शेतकऱ्यासाठी कचरा टाकण्याची वेगळी जागा अशी काळजी घेऊन, एकही खरेदी केंद्र कोविड-19 चे हॉट स्पॉट होणार नाही,याची काळजी घेण्यात आली.

यावर्षी मध्यप्रदेशातून सर्वाधिक म्हणजेच 129 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला. दरवर्षी पंजाब या खरेदीत अग्रस्थानी असतो, यंदा पंजाबमधून 127 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला. गव्हाच्या पुरवठ्यात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या सर्व राज्यांनीही मोठे योगदान दिले. संपूर्ण भारतात, 42 लाख शेतकऱ्यांना या गहूखरेदीचा लाभ झाला. या खरेदीपोटी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीच्या हिशेबाने, शेतकऱ्यांना 73,500 कोटी रुपये निधी देण्यात आला.

याच काळात, सरकारी संस्थांनी 119 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी देखील केली असून, 13,606  केंद्रातून ही खरेदी करण्यात आली. तेलंगणा राज्यातून सर्वाधिक म्हणजेच, 64 लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आली असून आंध्र प्रदेशातून 31 लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आली आहे. तांदूळ आणि गव्हाची राज्यनिहाय खरेदी खालील तक्त्यात सविस्तर दिली आहे:-

गहू:

अनु.क्र.

राज्याचे नांव

गहू खरेदीचे प्रमाण (लाख मेट्रिक टनमध्ये)

1

मध्य प्रदेश

129

2

पंजाब

127

3

हरियाणा

74

4

उत्तर प्रदेश

32

5

राजस्थान

19

6

इतर

01

एकूण

382

तांदूळ/धान

अनु.क्र.

राज्याचे नांव

तांदूळ/धान खरेदीचे प्रमाण (लाख मेट्रिक टनमध्ये)

1

तेलंगणा

64

2

आंध्र प्रदेश

31

3

ओदिशा

14

4

तामिळनाडू

04

5

केरळ

04

6

इतर

02

एकूण

119

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapuca Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT