Share Market
Share Market  
अर्थविश्व

Share Market Update : कोरोनाच्या धास्तीने सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले

दैनिक गोमंतक

देशातील भांडवली बाजाराने महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील शेवटच्या सत्रात घसरण नोंदवली आहे. याशिवाय आजच्या सत्रात घसरण नोंदवत भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मागील तीन सत्रांपासून सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लावला आहे. मागील तीनही सत्रव्यवहारांमध्ये भांडवली बाजाराने तेजी नोंदवली होती. त्यामुळे आज पुन्हा शेअर मार्केटमध्ये घसरण बघायला मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अस्थिरता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक बीएसईने 0.31 टक्क्यांनी घसरण नोंदवल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 0.26 टक्क्यांनी खाली आला. (The Sensex and Nifty have seen decline in capital markets due to the increasing cases of corona)

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सावध पवित्र घेतला असल्याचे दिसते आहे. आजच्या सत्र व्यवहारात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) कालच्या तुलनेत 154.89 अंशांनी खाली येत 49,591.32 वर बंद झाला. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 38.95 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 14,834.85 च्या पातळीवर स्थिरावला. यापूर्वी मागील तीन सत्र व्यवहारांमध्ये भांडवली बाजाराने तेजी नोंदवली होती. 

रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या पतधोरणात बदल करण्यात आला नव्हता. मात्र अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या रोख्यांना रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली होती. त्यामुळे बुधवारी भांडवली बाजाराने या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर कालच्या व्यवहारात भांडवली बाजारातील मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 84.45 अंकांच्या किरकोळ वाढीसह 49,746.21 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सुद्धा 54.75 अंशांच्या वाढीसह 14,873.80 च्या पातळीवर बंद झाला होता. 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. तर महाराष्ट्र बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, बँक ऑफ बरोडा, सन फार्मा, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस, टायटन या कंपन्यांचे समभाग वधारले. 


        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT