Indian Ministry of Railways has given permission to reopen the retiring rooms at divisional railway stations
Indian Ministry of Railways has given permission to reopen the retiring rooms at divisional railway stations 
अर्थविश्व

'भारतीय रेल्वे'कडून प्रवाशांना 25 रुपयांत मिळणार ही खास सुविधा

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वे स्थानकांवरील रिटायरिंग कक्ष पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोविडशी संबंधित प्रोटोकॉलची काळजी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे बोर्डाने यापूर्वीच रिटायरिंग कक्ष, रेल्वे प्रवासी निवासस्थाने आणि आयआरसीटीसी संचलित हॉटेल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

सध्या आवश्यकतेनुसार अनेक विशेष एक्स्प्रेस / प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेता रेल्वेने स्थानकांवर रिटायरिंग कक्ष सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. कोविड -19 चा प्रसार थांबविण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या प्रवासी सुविधा बंद करण्यात आल्या होत्या.

फक्त 25 रुपयांमध्ये मिळणार कक्ष

रेल्वे केवळ 25 रुपयांमध्ये रिटायरिंग कक्ष बुक करण्याची सुविधा देत आहे. आपण रिटायरिंग कक्ष आणि डॉर्मिटरीज कमीतकमी 3 तास आणि जास्तीत जास्त 48 तासांसाठी बुक करू शकता. बुकिंगची सुविधा आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. 3 तासांपर्यंत बुकिंगसाठी 25 रुपये, 24 तासांसाठी 100 रुपये आणि 48 तासांच्या बुकिंगसाठी 200 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. जर तुम्ही डिजीटल पेमेंट केले तर 5 रुपयांची सूटही तुम्हाला मिळणार आहे.

यांना मिळणार ही सुविधा

कंफर्म तिकिट असणाऱ्यांना प्रवाशांना या रेल्वे सुविधेचा लाभ मिळणार आहे. समान बुकिंग सोर्स आणि डेस्टिनेशन स्टेशन रिटायरिंग कक्ष पीएनआर क्रमांकावर बुक करता येणार आहे रिटायरिंग कक्ष चेक इन करण्याच्या 48 तास आधी रद्द केल्यास 20 टक्के रक्कम कपात केली जाईल. किंवा आपण 24 तासात रद्द केल्यास 50 टक्के रक्कम कपात केली जाईल.

आपण अशा प्रकारे बुक करू शकता 

  • सर्व प्रथम IRCTCच्या वेबसाइटवर जा.
  • आपल्या नावाचे अकाउंट क्रियेट करा आणि आपला पासवर्ड सेट करा.
  • यानंतर तुमच्या तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाका.
  • त्यानंतर रिटायरिंग कक्ष बुक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT