OTT
OTT Dainik Gomantak
अर्थविश्व

18 OTT प्लॅटफॉर्म आणि 57 सोशल मीडिया अकाउंट्सवर केंद्र सरकारकडून बंदी

Ashutosh Masgaunde

Central government bans 18 OTT:

केंद्र सरकारने ओटीटी, सोशल मीडिया अकाऊंट आणि अनेक वेबसाइटवर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 OTT, 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहेत.

या प्लॅटफॉर्मवर अश्लील साहित्य पोस्ट केल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, या प्लॅटफॉर्मना यापूर्वी अनेकदा इशारा देण्यात आला होता.

केंद्र सरकारने ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया खात्यांमध्ये 12 फेसबुक, 17 एक्स, 16 इन्स्टाग्राम आणि 12 यूट्यूब खाती आहेत.

या प्लॅटफॉर्म, खाती, ॲप्स आणि वेबसाइट्सवर आयटी कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सामग्रीवर कारवाई करण्यात आली आहे.

ज्या ॲपवर कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी ७ गुगल प्ले स्टोअरवर आणि ३ ॲपल ॲप स्टोअरवर आहेत. सर्व 57 सोशल मीडिया खाती बंद करण्यात आली आहेत.

या OTT ॲप्सवर बंदी

ड्रेनू फिल्मा

येम्मा

अनकट अड्डा

निऑन एक्स व्हीआयपी

बेशरम्स

Xtramood

मूडएक्स

मोजफ्लिस

हेट शॉट्स व्हीआयपी

फुजी

चिकूलिन

प्राइम प्ले

हंटर

रॅबिट

ट्राय फ्लिका

एक्स प्रुम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT