वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून हॉटेलमध्ये शूट केला 18 वर्षीय मॉडेलचा अश्लील व्हिडिओ

महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील विरार भागात ही घटना घडली आहे.
Mumbai
Mumbai

Mumbai: वेब सीरिजमध्ये काम देतो असे सांगून 18 वर्षीय मॉडेलचा अश्लील व्हिडिओ चित्रित केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एवढेच नाही तर संशयित आरोपीने हा व्हिडिओ एका वेबसाइटवर देखील अपलोड केला.

महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील विरार भागात ही घटना घडली आहे. पीडितेने अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्याच्या तब्बल दोन महिन्यांनंतर एका महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पीडित मॉडेल वसई येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. मॉडेलिंगसोबतच ती बॉलिवूड चित्रपटांमध्येही कामाच्या शोधात होती. एका अनोळखी व्यक्तीने 1 नोव्हेंबर रोजी फोन केला.

प्रॉडक्शन हाऊसमधून बोलत असल्याचे सांगत एका नवीन वेब सीरिजसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. तिला त्यात काम करायचे असेल तर ती ऑडिशनसाठी येऊ शकते, असे त्याने सांगितले.

ऑडिशनसाठी त्या मॉडेलला विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी बोलावण्यात आले. त्याठिकाणी भेटलेल्या लोकांनी मॉडेलला हॉटेलमध्ये घेऊन जात ऑडिशनच्या नावाखाली न्यूड होण्यास सांगितले. सीनची मागणी आहे असे सांगत व्हिडिओ शूट करून घेतला.

मात्र काही दिवसांनी तिचा अश्लील व्हिडिओ एका अॅडल्ट वेबसाइटवर अपलोड केल्याचे आढळून आले. पीडितेने व्हिडिओ पाहताच पोलिसांत धाव घेत तिने 12 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेगवेगळ्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

पोलिसांनी याप्रकरणी अनुज कुमार जयप्रकाश जैस्वाल याच्यासह एका 33 वर्षीय महिलेला विरार येथून अटक केली आहे. तसेच, सरजूकुमार रमाकांत विश्वकर्मा (25, रा. बदलापूर, ठाणे) यालाही अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com