Karul Ghat Accident : करुळ घाटात 350 फूट खोल दरीतही जावून वाचला दाम्पत्याचा जीव

पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीमच्या सदस्यांचे बचावकार्य
karul Ghat Accident
karul Ghat AccidentDainik Gomantak

Sindhudurg Accident News : कारवरील ताबा सुटल्याने तब्बल 350 फूट खोल दरीत कार कोसळली. ही घटना करुळ घाटात गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीम घटनास्थळी दाखल झाले.

तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या करुळ घाट हा मोठी वर्दळ असलेला सर्वात महत्वाचा घाट आहे.

karul Ghat Accident
पती-पत्नी घरातच होते, झाड कोसळून घर जमीनदोस्त पण दैव बलवत्तर म्हणून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलमठ येथील राणे दाम्पत्य कारने कोल्हापूरहून कणकवलीकडे करुळ घाट मार्गे जात होते. घाटातील धोकादायक वळणावर कार आली असता कारवरील ताबा सुटल्याने कार 350 फूट खोल दरीत कोसळली. या घाटात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. इतर वाहन चालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी पोहचले. तसेच करुळ सह्याद्री जीवरक्षक टीमही घटनास्थळी दाखल झाली. पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीमचे सदस्य दरीत उतरले व दोरीच्या सहाय्याने अपघातग्रस्त दाम्पत्याला बाहेर काढले.

जखमीं दाम्पत्याला येथील जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैभववाडी पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com