रोजगाराच्या शोधात आलेले ओडिशातील 9 तरुण कोकणात ओलीस, व्हिडिओ व्हायरल झाला अन् समोर आले सत्य

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तात्काळ करवाई केली.
Fishing Boat
Fishing BoatDainik Gomantak

Devgad Sindhudurg: रोजगाराच्या शोधात आलेल्या ओडिशा राज्यातील 9 तरुणांना कोकणात ओलीस ठेवण्यात आले. तरुणांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मिडियावर प्रसिद्ध केला, तसेच नातेवाईकांना देखील पाठवला. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तात्काळ करवाई केली.

नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तेथून महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओलीस ठेवलेल्या तरुणांची सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जहाजात काम देण्याच्या नावाखाली ओडिशातून नऊ तरुण महाराष्ट्रात आले. कामाला नकार दिल्यानंतर तरुणांना तेथेच ओलीस ठेवण्यात आले. तरुणांचा तेथे छळ करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

तरुणांनी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

प्रकार महाराष्ट्राच्या देवगड येथील असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तात्काळ घटनास्थळ गाठून तरुणांची गुरुवारी सुटका केली. यातील दोन तरुणांना त्यांच्या नातेवाईक घेऊन गेले आहेत. उर्वरित सात तरुणांना पोलिसांनी मुंबईला पाठवले आहे. मुंबईमधून तरुण त्यांच्या मूळगावी परत जातील, अशी माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com