Viral Video Of Cameroon's Footballer: गोल करून बलाढ्य ब्राझिलला पराभूत करणाऱ्या कॅमेरूनच्या खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल

आधी पंचांकडून स्तुती, पण टी शर्ट काढून जल्लोष केल्यानंतर दाखवले रेड कार्ड
Vincent Abubakar
Vincent AbubakarDainik Gomantak

Viral Video Of Cameroon Footballer: यंदाच्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुपमधील लढतींमध्येच अनेक धक्कादायक पराभव पाहायला मिळाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता झालेल्या ब्राझिल विरूद्ध कॅमेरून या सामन्यातही ब्राझिलला कॅमेरून संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. (FIFA Football World Cup 2022)

Vincent Abubakar
FIFA World Cup 2022: 'राऊंड ऑफ 16'चा थरार आजपासून, जाणून घ्या टाईमटेबल

शुक्रवारी ग्रुप जी मधील दोन सामने झाले. एका सामन्यात कॅमेरूनने ब्राझिलला 1-0 ने पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडने सर्बियावर 3-2 अशा गोलफरकाने मात केली. या गटातून ब्राझिल आणि स्वित्झर्लंडने राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला.

तथापि, ब्राझिलचा पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. कॅमेरून संघाने ब्राझिलला पराभूत करून समीकरणे बदलून ठेवली. भरपाई वेळेत (90+2) कॅमेरूनच्या विन्सेंट अबुबकर याने गोल करत ब्राझिलचा पराभव केला.

अबुबकर याने जेरोम एंगोम याला चकवल्यानंतर ब्राझिलचा गोलकीपर अँडरसन यालाही चकवले आणि जबरदस्त गोल केला. कॅमेरूनने प्रथमच ब्राझिलचा पराभव केला. तथापि, या गोलनंतर विन्सेंट याला मैदान सोडावे लागले. कारण गोल केल्यानंतर जल्लोष करताना त्याने टी-शर्ट काढला होता. त्यामुळे रेफ्रींनी त्याला रेड कार्ड दाखवले. त्यानंत विन्सेंट याने पंचांचा निर्णय मान्य करत पंचांशी हस्तांदोलन करत शांतपणे आनंदाने मैदान सोडले.

Vincent Abubakar
Nora Fatehi Viral Video: फिफा फॅनफेस्टमध्ये नोराकडून 'तिरंगा' चा अपमान, पाहा व्हिडीओ

विशेष म्हणजे अबूबकर आणि त्यांचा संघ जल्लोष करेपर्यंत रेफ्रींनी वाट पाहिली. कारण ब्राझिलच्या तुलनेत कॅमेरून संघ दुबळा होता. त्यामुळे हा गोल कॅमेरूनसाठी किती महत्वाचा आहे, याची कल्पना पंचांनाही असावी. त्यानंतर सर्व संघ मैदानात आल्यानंतर पंचांनी अबूबकर याचे कौतूक केले. आणि त्याला रेड कार्ड दाखवले. या पराभवानंतरही ब्राझिल गुणतक्त्यात अव्वल राहिला. आता राऊंड ऑफ सिक्सटीनमध्ये ब्राझिलचा सामना दक्षिण कोरियाशी तर स्वित्झर्लंडचा सामना पोर्तुगालशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com