W,W,W,W,W,W,W... आजी विम्बल्डन चॅम्पियन, नातवानं घेतल्या एका षटकात 6 विकेट्स

Cricket Record, 6 Wickets in 6 Balls: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही घडते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
Wickets
Wickets Dainik Gomantak

Cricket Record, 6 Wickets in 6 Balls: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही घडते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. कधी फलंदाज अफलातून फलंदाजी करतात तर कधी अशक्य झेल पकडले जातात. असाच एक अशक्य वाटणारा पराक्रम क्रिकेटच्या मैदानावर घडला, जेव्हा एका ज्युनियर खेळाडूने 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्या.

या खेळाडूने दुर्मिळ कामगिरी केली

क्रिकेटचा (Cricket) कोणताही फॉरमॅट असो, प्रत्येक गोलंदाजाला हॅट्ट्रिक करायची असते. कोणत्याही फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक घेणे दुर्मिळ आहे, परंतु 12 वर्षांच्या मुलाने एकदा नव्हे तर दोनदा हा पराक्रम केला. ऑलिव्हर व्हाईट हाऊस नावाच्या या खेळाडूने आपल्या क्लबसाठी आश्चर्यकारक षटक टाकले. ऑलिव्हरने या षटकात 'दुहेरी हॅट्ट्रिक' पूर्ण केली, म्हणजे प्रत्येक चेंडूवर विकेट घेतली.

Wickets
ENG vs AUS: कोहली नाही, 'हा' फलंदाज मोडणार सचिनचा सर्वात मोठा रेकॉर्ड; चाहत्यांनाही विश्वास बसणार नाही!

2 षटकात धावा न देता 8 विकेट्स

ऑलिव्हर व्हाइट हाऊसने या महिन्यात कुकहिलविरुद्ध ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळताना हा पराक्रम केला. ऑलिव्हरने 6 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाच्या 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

ऑलिव्हरने दोन षटकांत एकही धाव न देता आठ बळी घेतले. ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लब संघाचा कर्णधार जेडेन लेविटने बीबीसीशी बोलताना सांगितले की, 'त्याने (ऑलिव्हर) जे काही साध्य केले त्यावर माझा विश्वास बसत नाही. त्याच्याबद्दल सांगणे कठीण आहे.'

Wickets
ENG vs AUS: कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' अनोखा पराक्रम, इंग्लंडच्या संघाने सर्वांना केले आश्चर्यचकित!

ऑलिव्हर हा टेनिस चॅम्पियनचा नातू आहे.

लेविट पुढे म्हणाला की, 'एका षटकात दुहेरी हॅट्ट्रिक मिळवणे आश्चर्यकारक आहे. हा एक अप्रतिम प्रयत्न आहे आणि मला असे वाटते की, जोपर्यंत तो वयाने मोठा होत नाही तोपर्यंत त्याला त्याचे महत्त्व कळू शकणार नाही. विशेष म्हणजे, ऑलिव्हरची आजी 1969 ची विम्बल्डन टेनिस चॅम्पियन एन जोन्स आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com