WPL 2023 Auction: केवळ हरमनप्रीत, मानधनाच नाही, तर 'या' 6 भारतीय खेळाडूंनाही लागू शकते मोठी बोली

पहिल्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 हंगामासाठी सोमवारी लिलाव होणार आहे.
WPL 2023 Auction
WPL 2023 AuctionDainik Gomantak

WPL 2023 Auction: महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगामाचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) मुंबईत पार पडणार आहे. वूमन्स प्रीमियर लीगचा हा पहिलाच लिलाव असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. हा लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.

या लिलावात एकूण 448 खेळाडूंचा समावेश असून त्यातील एकूण 90 जागांसाठी बोली लागणार आहे. त्यामुळे आता 5 संघ या लिलावात आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडू घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या लिलावासाठी प्रत्येक संघाकडे 12 कोटींची पर्स आहे म्हणजेच संघ तयार करण्यासाठी संघ 12 कोटींपर्यंत खर्च करू शकतात.

या लिलावात नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक स्टार भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या लिलावासाठी सर्वाधिक 50 लाखाची मुळ किंमत असलेल्या 24 खेळाडूंमध्ये 8 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या 8 खेळाडूंवर सर्वांचीच नजर असेल. पण त्यातीलच कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागू शकते यावर एक नजर टाकू.

WPL 2023 Auction
WPL 2023: आज होणाऱ्या पहिल्या महिला आयपीएलचा लिलाव कुठे अन कधी पाहाणार, घ्या जाणून एका क्लिकवर
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak

1. हरमनप्रीत कौर

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या लिलावात आकर्षणाचे केंद्रबिंदू असेल. तिला संघात घेण्यासाठी जवळपास सर्वच संघ प्रयत्न करू शकतात. हरमनप्रीतकडे आक्रमक फटके खेळण्याची क्षमताही आहे, तसेच ती चांगली गोलंदाजीही करू शकते.

त्याचबरोबर तिच्या संघात असण्याने कर्णधारपदासाठीही चांगला पर्याय संघाला मिळू शकतो. तिने आत्तापर्यंत 147 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यात तिने 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 2956 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्स घेतल्या आहेत.

Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak

2. स्मृती मानधना

हरमनप्रीत प्रमाणेच भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनावर देखील सर्वांचेच लक्ष असेल. मानधनाने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी फलंदाजीत मोठे योगदान दिले आहे. तसेच तिच्याकडे तिच्या फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.

याचबरोबर ती देखील कर्णधारपदासाठी संघांना चांगला पर्याय ठरू शकते. त्याचमुळे लिलावात तिच्यावरही मोठी बोली लागू शकते. तिने आत्तापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 20 अर्धशकांसह तिने 2651 धावा केल्या आहेत.

Jemimah Rodrigues
Jemimah RodriguesDainik Gomantak

३. जेमिमाह रोड्रिग्ज

जेमिमाहने नुकतेच रविवारी पाकिस्तान महिला संघाविरुद्ध महिला टी20 वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यात नाबाद अर्धशतक करत तिच्याकडे लक्ष खेचले आहे. 22 वर्षीय जेमिमाह कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकते, ही तिच्यासाठी जमेची बाजू आहे.

ती आक्रमकही फलंदाजी करू शकते. त्यामुळे तिलाही घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ दिसण्याची शक्यता आहे. जेमिमाहने 76 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1628 धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या 10 अर्धशतकांचाही समावेश आहे.

Deepti Sharma
Deepti SharmaDainik Gomantak

4. दीप्ती शर्मा

भारतीय संघाची प्रमुख अष्टपैलू दीप्ती शर्मालाही या लिलावात मोठी मागणी असणार आहे. टी2 0क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू महत्त्वाचे असतात. याचा विचार करता तिला मोठी बोलीही लागू शकते. दीप्ती फलंदाजीत मधल्या फळीत महत्त्वाचे योगदान देऊ शकते. तसेच गोलंदाजीतही ती तिचे भरीव योगदान देऊ शकते.

तिने आत्तापर्यंत तिच्या अष्टपैलू खेळाने भारताला बरेच सामने जिंकून दिले आहेत. तिने आत्तापर्यंत 88 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून 914 धावा केल्या आहेत. तसेच तिने 97 विकेट्स घेतल्या आहेत.

Renuka Singh
Renuka Singh Dainik Gomantak

5. रेणूका सिंग

आयसीसीचा 2022 सालचा सर्वोत्तम महिला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या रेणूका सिंगच्या बोलीकडेही अनेकांचे लक्ष असेल. एक उत्तम गोलंदाज म्हणून ती उदयास येत असून भारतीय संघात झुलन गोस्वामीची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिलाही या लिलावात मोठी मागणी असू शकते. तिने आत्तापर्यंत खेळलेल्या 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.

WPL 2023 Auction
WPL: 'या' दिवशीपासून रंगणार बीसीसीआयच्या पहिल्या महिला प्रीमियर लीग T-20 चा थरार
Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak

6. शफाली वर्मा

वरच्या फळीतील आक्रमक फलंदाज असलेल्या शफालीच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वीच 1 9वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. या स्पर्धेत शफलीची कामगिरी चांगली झाली होती.

दरम्यान, शफलीकडे असलेली आक्रमक फलंदाजीची क्षमता लक्षात घेता तिच्यावर फ्रँचायझी मोठ्या रकमेची बोली लावताना दिसू शकतात. तसेच ती अद्याप 19 वर्षांचीच असल्याने भविष्याच्या दृष्टीनेही तिला संघात घेण्याचा फ्रँचायझींचा मानस असू शकतो. शफालीने आत्तापर्यंत 52 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 5 अर्धशतकांसह 1264 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com