Video: पारंपरिक फेट्यात दिसला Sachin Tendulkar चा मराठी स्वॅग

Sachin Tendulkar Video: सचिनचा मोठा भाऊ नितीन यांची मुलगी करिष्माच्या लग्नातील हा व्हिडीओआहे.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Dainik Gomantak

सचिन तेंडुलकरला क्रिकेट जगताचा देव म्हटले जाते. सचिन केवळ त्याच्या क्रिकेट रेकॉर्ड आणि खेळामुळेच चर्चेत असतो असे नाही, तर चाहत्यांना त्याच्या कुटुंबाच्या बातम्यांबद्दलही खूप उत्सुकता असते. सचिन आणि त्याचे कुटुंब नेहमीच अनेक मराठी सण-उत्सव, कार्यक्रम, समारंभ यांमध्ये उत्साहाने भाग घेताना दिसले आहेत. आताही असाच एका पारंपरिक वेशातील सचिनचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन मराठी फेटा बांधून घेत असलेला दिसत आहे. सचिनचा (Sachin Tendulkar) मोठा भाऊ नितीन यांची मुलगी करिष्माच्या लग्नातील हा व्हिडीओआहे. आपल्या पुतणीच्या लग्नात सचिन तयार होतानाचा हा व्हिडीओ आहे.

इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (Video) सचिन तेंडुलकर सांगत आहे की, आज त्याचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिश्माचे लग्न आहे. त्यामुळेच ते एकमेकांना डोक्यावर बांधत आहेत. कारण त्यांना पारंपारिक पोशाखात दिसावे लागेल. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही सचिन तेंडुलकरने पारंपरिक पोशाख, आणि सेलिब्रेशन असे शब्द वापरले आहेत.

नितीन तेंडुलकर चार भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी सचिनने अशी तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर त्याच्या स्टारडमसाठी नाही तर त्याच्या साध्या स्वभावासाठी ओळखला जातो. सचिन अनेकदा त्याच्या आयुष्याशी संबंधित क्षण सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com