National Game Goa 2023 : देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये जातील : उपराष्ट्रपती जगदीप धनकड

National Game Goa 2023 : ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार सोहळ्याने समारोप
37 th National Game Goa 2023
37 th National Game Goa 2023 Dainik Gomantak

National Game Goa 2023 : पणजी, ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशी खेळांना सहभागी करून घेतले होते. यापुढे एक ना एक दिवस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या देशी खेळांचा समावेश होईल, असा आशावाद उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी बांबोळी येथे व्यक्त केला. ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, उत्तराखंडच्या क्रीडामंत्री उषा आर्य, महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार जेनिफर मोन्सेरात, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी.टी. उषा उपस्थित होत्या.

उपराष्ट्रपती म्हणाले, भारत आता पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता जपान आणि जर्मनीला मागे सारण्याचे लक्ष्य आहे. २०३०पर्यंत भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल. अमृतकाळ हा देशासाठी गौरवकाळ आहे. विकसित देशांच्या एकूण डिजिटल व्यवहारांपेक्षा चौपट डिजिटल व्यवहार गेल्या वर्षभरात आपल्या देशात झाले आहेत.

२०१४ पासून पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने अनेक गोष्टी साध्य होत आहेत. मी याआधी केंद्रीय मंत्री होतो. आघाडी सरकारांच्या काळात देशाची कशी वाट लागते, ते पाहिले आहे. सोने तारण ठेवण्याची वेळ एकेकाळी या देशावर आली होती. आता जबरदस्त विदेशी गंगाजळी देशाकडे आहे, हे आपसुक घडलेले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी त्यामागे आहे, उपराष्ट्रपतींनी सांगितले.

रंगारंग कार्यक्रम

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात गायक कलाकार स्वरूप खान आणि गोमंतकीय गायिका सोनिया शिरसाट यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. या रंगरंग सोहळ्याला मोठ्या प्रमाणात रसिकप्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

37 th National Game Goa 2023
National Games 2023 वर राज्याने खर्च केले 450 कोटी रूपये; गेल्या 15 दिवसांत घेतले 300 कोटीचे कर्ज...

आयोजनाचा सन्मान

यावेळी स्पर्धेच्या नेटक्या आयोजनासाठी तांत्रिक आचार समितीचे अध्यक्ष अमिताभ शर्मा, क्रीडा सचिव श्वेतिका सचन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, क्रीडा संचालक अरविंद खुटकर, संयुक्त लेखा संचालक संध्या फळदेसाई यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

रसिक झाले मंत्रमुग्ध

समारोप सोहळ्याला सुरवात होण्यापूर्वी सोनिया शिरसाट, स्वरूप खान यांनी आपल्या स्वरांनी सर्वांना रिझविले. राजभवनातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम लांबल्याने पाहुण्यांच्या आगमनापर्यंत त्याच त्या ध्वनिचित्रफिती दाखवण्याची वेळ आयोजकांवर आली. पाहुण्यांसमोर गोमंतकीय नृत्यप्रकारांचा समावेश असलेला कार्यक्रम मुकेश घाटवळ व सहकाऱ्यांनी सादर केला. मंचावर दीपोत्सवही करण्यात आला होता.

सरकारने आता क्रीडापटूंसाठी नोकरीत आरक्षणाची घोषणा केली आहे. आता खासगी क्षेत्रानेही त्याचे अनुकरण करावे. त्यांनी क्रीडापटूंना साहाय्य करावे. जगातील अनेक देश आपल्याला त्या देशातील एखाद्या महान क्रीडापटूमुळे माहिती होतात. आताची स्पर्धा ही राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा होती

- जगदीप धनकड, उपराष्ट्रपती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com