WPL 2023, MI vs GG: मुंबई इंडियन्सची कमाल, गुजरातचा पुन्हा दणदणीत पराभव; प्लेऑफमध्ये मिळवले स्थान

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला.
Mumbai Indians
Mumbai Indians Dainik Gomantak

WPL 2023, MI vs GG: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यातही मुंबईने आपले वर्चस्व दाखवून गुजरातचा एकतर्फी पराभव केला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने (Mumbai) आठ गडी गमावून 162 धावा केल्या. संपूर्ण षटके खेळल्यानंतर गुजरात संघाला नऊ गडी गमावून केवळ 107 धावा करता आल्या आणि सामना गमवावा लागला.

या दोन संघांमधील हा या मोसमातील दुसरा सामना होता. दोन्ही सामन्यात फक्त मुंबईने विजय मिळवला आहे. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना या दोन संघांमध्येच झाला.

Mumbai Indians
WPL 2023: सलग पाच पराभवानंतरही RCB करू शकते प्लेऑफसाठी क्वालिफाय, कसं ते घ्या जाणून

तसेच, मुंबईचा हा सलग पाचवा विजय आहे. मुंबईला आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) शानदार खेळी करत अर्धशतक झळकावले. तिने 30 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर, सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटियाने 37 चेंडूत 44 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com