कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याविरुध्द मध्य प्रदेशने उभारली मोठी धावसंख्या

शेवटच्या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्याच दिवशी गोव्यावर वर्चस्व राखले
Cricket

Cricket

Dainik Gomantak

पणजी : कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील (Cricket) एलिट क गटातील शेवटच्या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्याच दिवशी गोव्यावर वर्चस्व राखले. चार दिवसीय सामन्यास सोमवारपासून सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर सुरवात झाली.

<div class="paragraphs"><p>Cricket</p></div>
Under-19 World Cup: अफगाणिस्तानच्या 18 वर्षीय फलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा

अक्षत रघुवंशी आणि अभिषेक मावी यांच्या शतकाच्या बळावर मध्य प्रदेशने सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 90 षटकांत 4 बाद 366 धावा केल्या. अक्षतने 135 चेंडूंत 15 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. अभिषेक मावी 139 धावांवर नाबाद आहे. त्याने 187 चेंडूंतील खेळीत 20 चौकार व एक षटकार मारला. गोव्याने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते.

अक्षत व अभिषेक यांनी चौथ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिवसअखेर 43 धावांवर नाबाद असलेल्या आर्यन देशमुख याच्यासमवेत अभिषेकने पाचव्या विकेटसाठी 126 धावांची अभेद्य भागीदारी केली. गोव्याने 26 षटकांतील खेळात मध्य प्रदेशला (Madhya Pradesh) 3 बाद 79 असे रोखले होते, मात्र नंतर गोलंदाजांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखणे जमले नाही.

<div class="paragraphs"><p>Cricket</p></div>
गोव्यातील प्रसिद्ध गोलंदाज आणि क्रिकेट प्रशिक्षक मारीयान अँथोनी यांचे निधन

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव : 90 षटकांत 4 बाद 366 (पृथ्विराजसिंग तोमर 20, अमनसिंग सोळंकी 36, शुभम कुशवाह 14, अक्षत रघुवंशी 107, अभिषेक मावी नाबाद 139, आर्यन देशमुख नाबाद 43, फरदीन खान 17-3-60-2, लखमेश पावणे 11-2-50-0, दीप कसवणकर 18-3-69-1, मनीष काकोडे 17-0-65-0, उदित यादव 20-0-79-1, आर्यन नार्वेकर 6-0-26-0, आयुष वेर्लेकर 1-0-11-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com