Women's Tennikoit Tournament : खांडोळा सरकारी महाविद्यालय अव्वल

ताळगाव पठार येथील विद्यापीठ सिल्व्हर ज्युबिली हॉलमध्ये पार पडली स्पर्धा
Women's Tennikoit Tournament
Women's Tennikoit Tournament Dainik Gomantak

पणजी: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला टेनिकॉईट स्पर्धेत खांडोळा महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले. यापूर्वी त्यांनी पुरुष गटातही अव्वल कामगिरी बजावली आहे.

(Khandola Government College win goa university Women's Tennikoit Tournament)

Women's Tennikoit Tournament
T20 World Cup 2022 साठी ICC ने केली 5 सर्वोत्तम खेळाडूंची निवड, एक भारतीयपण !

ही स्पर्धा शनिवारी ताळगाव पठार येथील विद्यापीठ सिल्व्हर ज्युबिली हॉलमध्ये झाली. अंतिम लढतीत खांडोळा सरकारी महाविद्यालयाने केपे सरकारी महाविद्यालयावर 2-0 फरकाने विजय नोंदविला. अल्पिता खेडेकर हिने श्वेता गावकर हिच्यावर 21-5, 21-11 फरकाने, तर कल्पिता वेळकसकर हिने डॉली फर्नांडिस हिच्यावर 21-11, 21-5 फरकाने मात केली. उपांत्य फेरीत खांडोळा महाविद्यालयाने पेडणे सरकारी महाविद्यालयावर 2-0 असा, तर केपे महाविद्यालयाने म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयावर 2-0 फरकाने विजय मिळविला होता.

Women's Tennikoit Tournament
National Tournament : गोव्याच्या विजयात 'करिष्मा'चा धडाका

विजयी खांडोळा महाविद्यालयाचे अल्पिता खेडेकर, कल्पिता वेळकसकर, तनाया गावडे व ततीक्षा गावडे यांनी, तर उपविजेत्या केपे महाविद्यालयाचे श्वेता गावकर, डॉली फर्नांडिस, छाया पाटील, अंकिता गावकर यांनी प्रतिनिधित्व केले. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक जॉस्लिन डिसोझा यांच्या हस्ते झाले. यावेळी गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा सहाय्यक संचालक भालचंद्र जदार, सहाय्यक क्रीडा अधिकारी अविध मोरजकर यांची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com