IPL 2023: 'तुला मानलं भाऊ...', सूर्याच्या तूफानी खेळीवर किंग कोहलीची मराठीत खास पोस्ट

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडेवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने तूफानी शतक झळकावले.

आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक आहे. सूर्याने गुजरातविरुद्ध 103 धावांची विस्फोटक खेळी खेळली आणि संघाला 218 धावांपर्यंत नेले.

सूर्याने वेगवान फलंदाजी करताना 49 चेंडूंत 11 चौकार आणि 6 षटकारांसह 210 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 103 धावा केल्या.

कोहलीने लिहिले - तुला मानलं भाऊ...

विराट कोहलीने (Virat Kohli) एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्याने मराठीत लिहिले– 'तुला मानलं भाऊ…'

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Video: मुंबईचा सुर्या तळपला! 35 चेंडूत 83 धावा ठोकत 'हा' रेकॉर्डही केला

त्याचवेळी, वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) सूर्याच्या फलंदाजीचे तोंड भरुन कौतुक केले. त्याने ट्विटर करत म्हटले की, '17व्या षटकाच्या अखेरीस नाबाद 53 आणि 20 व्या षटकापर्यंत नाबाद 103. अप्रतिम सूर्यकुमार यादव. अप्रतिम फलंदाजी.'

Suryakumar Yadav
IPL 2023: 11 चौकार 6 षटकार, वानखेडेमध्ये सूर्याची 'त्सुनामी'; IPL कारकिर्दीतील ठोकले पहिले शतक

मुंबई इंडियन्सने 218 धावा केल्या

सूर्याच्या तूफानी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने या महत्त्वाच्या सामन्यात 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

सूर्यकुमारशिवाय सलामीवीर ईशान किशनने 31 आणि रोहित शर्माने 29 धावांची शानदार खेळी खेळली. तर विष्णू विनोदने 20 चेंडूत 30 आणि निहाल वढेराने 7 चेंडूत 15 धावा केल्या.

राशिद खानने पुन्हा अप्रतिम खेळ दाखवला, 4 विकेट घेतल्या

रशीद खान गुजरात टायटन्ससाठी पुन्हा एकदा चमकला. त्याने 4 षटकात 40 धावा देत 4 बळी घेतले. मोहित शर्माला एक विकेट मिळाली.

मात्र, इतर सर्व गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. मोहम्मद शमीने 4 षटकांत 53 धावा, अल्झारी जोसेफने 4 षटकांत 52 धावा आणि नूर अहमदने 4 षटकांत 38 धावा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com