
गतविजेत्या हैदराबाद एफसीने (Hydrabad FC) यावेळच्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. संघाने पूर्ण वर्चस्व राखत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडवर (Northeast United) 3-0 असा एकतर्फी विजय नोंदविला. उत्तरार्धात बार्थोलोम्यू ओगबेचे याने पेनल्टी फटका अचूक मारला असता, तर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खाती आणखी एका गोलची भर पडली असती.
आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम केलेल्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने 13व्या मिनिटास हैदराबादला आघाडी मिळवून दिली. गतमोसमाच ‘गोल्डन बूट’ मिळवलेल्या नायजेरियन खेळाडूचा हा आयएसएलमधील वैयक्तिक 54वा गोल ठरला. विश्रांतीनंतर पाच मिनिटांनी हैदराबादला पेनल्टी फटका मिळाला, पण ओगबेचे याचा पेनल्टी फटका नॉर्थईस्टचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने अडविला. नंतर हालिचरण नरझरी याने 69व्या, तर बदली खेळाडू स्पॅनिश बोर्हा हेर्रेरा याने 73व्या मिनिटास गोल करून हैदराबादची आघाडी बळकट केली.
हैदराबादला स्पर्धेतील पहिल्या लढतीत मुंबई सिटीने 3-3 असे गोलबरोबरीत रोखले होते. गुरुवारी पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यामुळे त्यांचे आता दोन लढतीतून चार गुण झाले आहेत. नॉर्थईस्टला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला, अगोदरच्या लढतीत त्यांना बंगळूर एफसीने एका गोलने हरविले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.