Goa Professional League: स्पोर्टिंग क्लब द गोवा सहाव्यांदा चँपियन

Goa Professional League Sporting Club The Goa Sixth Champion
Goa Professional League Sporting Club The Goa Sixth Champion

पणजी : स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे मालक पीटर वाझ यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना विषाणू संसर्गाने निधन झाले, चार महिन्यानंतर आपल्या फुटबॉलवेड्या मालकास भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना संघाने शुक्रवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League) स्पर्धेत सहाव्यांदा विजेतेपद मिळविले. शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 9-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना मडगाव येथील चौगुले मैदानावर झाला. (Goa Professional League Sporting Club The Goa Sixth Champion)

कोविड-19 मुळे एकेरी साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत स्पोर्टिंगने सर्वाधिक 23 गुणांची कमाई केली. धेंपो स्पोर्टस क्लबचे 21 गुण झाले, त्यांना उपविजेतेपद मिळाले. कळंगुट असोसिएशन व साळगावकर एफसी यांच्यातील बाकी 18 मिनिटांचा खेळही शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. त्यावेळी पुन्हा पेनल्टी फटका अचूक ठरवत कळंगुट असोसिएशनने एकमेव गोलने विजय प्राप्त केला. कळंगुट व साळगावकर एफसीचे समान 20 गुण झाले. हेड-टू-हेड कामगिरीत सरस ठरल्यामुळे कळंगुट असोसिएशनला तिसरा, साळगावकर एफसीला चौथा क्रमांक मिळाला. कळंगुटसाठी पेनल्टीवर डॉमनिक फर्नांडिसने अचूक नेम साधला. हा सामना गमावल्यामुळे साळगावकर एफसी संघ विजेतेपदापासूनही दूर राहिला.

मडगाव येथील चौगुले मैदानावर स्पोर्टिंग क्लब पूर्वार्धात एका गोलने आघाडीवर होता. मार्कुस मस्कारेन्हास याने पहिला गोल तिसाव्या मिनिटास केला. 48व्या मिनिटास गौरवने, 49व्या मिनिटास अकेराजने, तर 54व्या मिनिटास गौतमने गोल केल्याने स्पोर्टिंग क्लबपाशी 4-0 अशी भक्कम आघाडी जमा झाली. त्यानंतर फिलिप ओदोग्वू व गौतमने गोल करून आघाडी 6-0 अशी वाढविली, 77व्या मिनिटास मार्कुसने आणखी एक गोल केला. सामन्याच्या अंतिम टप्प्यात फिलिप व मार्कुस यांनी हॅटट्रिक साधताना स्पोर्टिंगच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पोर्टिंग क्लबचे यश...

गोवा फुटबॉल असोसिएशनचा 2019-20 मोसम कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे अर्धवट राहिला होता. त्यामुळे स्पोर्टिंग क्लब व चर्चिल ब्रदर्सला गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत संयुक्त विजेते जाहीर करण्यात आले होते. स्पोर्टिंग क्लबने गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा सर्वप्रथम 2006 मध्ये जिंकली, त्यानंतर 2013-14, 2015-16 व 2017-18 मध्येही त्यांनी गोव्याचा चँपियन क्लब हा मान मिळविला. आता 2020-21 मोसमात अपराजित कामगिरीसह अव्वल स्थान राखत त्यांनी सहाव्यांदा विजेतेपद मिळविले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com