World Cup 2023: वर्ल्ड कपच्या तोंडावरचं ईडन गार्डनला ​​आग, ड्रेसिंग रुममधील सामान जळून खाक!

World Cup 2023: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या आधी एक वाईट बातमी समोर आली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमला ​​आग लागल्याचे वृत्त आहे.
Eden Gardens Stadium
Eden Gardens StadiumDainik Gomantak

World Cup 2023: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या आधी एक वाईट बातमी समोर आली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमला ​​आग लागल्याचे वृत्त आहे. बुधवारी (9 ऑगस्ट) रात्री उशिरा स्टेडियमच्या एका भागात आग लागली.

आग इतकी भीषण होती की, ड्रेसिंग रुममध्ये ठेवलेले बरेचसे सामान जळून खाक झाले. या स्टेडियममध्ये उपांत्य फेरीसह सुमारे अर्धा डझन सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आगीच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्टच्या रात्री 11.50 च्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले.

आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत बरेच सामान जळून खाक झाले होते. विश्वचषकापूर्वी (World Cup) या स्टेडियममध्ये नूतनीकरणाचे काम सुरु असून रात्रीही हे काम सुरु होते. दरम्यान, ड्रेसिंग रुममध्ये आग लागली.

Eden Gardens Stadium
ICC World Cup 2023 Tickets: 'या' दिवसापासून मिळणार वर्ल्डकपची तिकिटं; भारत-पाक सामन्यासाठी कधीपासून होणार बुकींग?

दरम्यान, ड्रेसिंग रुमच्या फॉल्स सिलिंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असे सांगण्यात येत आहे. क्रिकेटपटूंचे साहित्य ड्रेसिंग रुममध्ये ठेवण्यात आले होते, जे जळून खाक झाले.

जरी नुकसान फार मोठे नसले तरी ड्रेसिंग रुमचे पुन्हा नूतनीकरण करावे लागेल. मात्र, ही अचानक आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.

कोलकातामध्ये (Kolkata) 28 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपमधील पहिला सामना होणार आहे. या मैदानावर दुसऱ्या सेमीफायनलसह एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत.

Eden Gardens Stadium
World Cup 2023: शिक्कामोर्तब झालं! भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ICC ची घोषणा

दुसरीकडे, स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरु असून 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. आयसीसीचे प्रतिनिधीही कामाच्या प्रगतीमुळे खूश होते, परंतु ते पुढील महिन्यात पुन्हा येतील.

त्याआधी या घटनेने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (सीएबी) तणाव वाढला आहे. मात्र, आगीची माहिती मिळताच कॅबचे सहसचिव देबब्रत दास रात्रीच स्टेडियमवर पोहोचले आणि त्यांनी चौकशी करण्यास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com