Astro Tips: महिलांनी कोणत्या दिवशी केस धुणे मानले जाते शुभ, वाचा सविस्तर

हिंदु धर्मात अनेक नियम दिलेले आहेत. केस कापण्यापासून ते धुण्यापर्यंत नियम सांगितलेले आहे.
Astro Tips
Astro TipsDainik Gomantak

Astro Tips: हिंदू धर्मात अनेक नियम सांगितलेले आहे. ज्यांचे पालन आपल्याला लहानपणापासून केले जाते. नंतर हे नियम आपली सवय बनतात. यापैकी केस धुण्याचा नियम हा एक आहे. केस धुण्यासाठी आठवड्याचे काही दिवस शुभ तर काही अशुभ मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया आठवड्यातील कोणते शुभ दिवस आहेत ज्या दिवशी केस धुण्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते.

बुधवार

अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणे टाळावे. कारण या दिवशी केस धुतल्याने आयुष्यात समस्या येतात.

विवाहित महिला

विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणे अशुभ मानले जाते. जर विवाहित महिलांनी या दिवशी केस धुतले तर ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शुभ नसते. त्यामुळे या तीन दिवशी केस धुणे टाळावे

एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा

एकादशी,अमावस्या आणि पौर्णिमेला केस कापू नका किंवा धुवू नका. लोक या दिवशी उपवास करतात आणि दिवसाच्या सुरुवातीला ते स्नान करताना केस धुतात आणि पूजा करतात. पण या तिन्ही दिवशी केस धुवू नका. उपवासाच्या एक दिवस आधी केस स्वच्छ करा, पण जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील किंवा आवश्यक असेल तर कच्चे दूध पाण्यात मिसळून केस धुवा.

गुरुवार

गुरुवार हा असा दिवस आहे की या दिवशी पुरुष किंवा महिला दोघांनीही केस धुणे टाळावे. गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी केस धुतल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवु शकतात. म्हणूनच या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका.

शुक्रवार

केस धुण्यासाठी शुक्रवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. जर तुम्ही या दिवशी केस कापले तर ते तुमच्यासाठी शुभ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com