Goan Squid Masala Recipe: चविष्ट, अगदी कमी वेळात अन् कमी साहित्यामध्ये बनणारी खमंग डिश स्क्विड मसाला... रेसिपी घ्या जाणून

गोवेकरांच्या ताटात नेहमी मासळीही असतेच. यामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या मासळीच्या विविध डिशेस बनवल्या जातात.
Goan Squid Masala Recipe
Goan Squid Masala Recipe

Goan Squid Masala Recipe: गोवेकरांच्या ताटात नेहमी मासळीही असतेच. यामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या मासळीच्या विविध डिशेस बनवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे स्क्विड मसाला. चटपटीत आणि चविष्ट असलेली ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनते. इथे येणारे पर्यटक हॉटेल्समध्ये ही डिश नक्की मागवतात. चला तर मग आपल्या गोवन पद्धतीची ही साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी कशी बनते हे पाहूयात.

स्क्विड मसालासाठी लागणारे साहित्य :

  • स्वच्छ धुवून घेतलेले स्क्विड

  • लसूण

  • 2 बारीक चिरलेला कांदा

  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो

  • हळद

  • मीठ

  • धणे पावडर

  • गरम मसाला

  • तिखट

  • तेल

कृती :

  • स्क्विड स्वच्छ धुऊन त्याचे बारीक काप करून घ्यावेत

  • कढईत तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकावा. त्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालावेत. कांदे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.

  • त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकावा .

  • कांदा-टोमॅटो परतून त्यामध्ये आले-लसणाची पेस्ट घालावी

  • सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये हळद, धणे पावडर, गरम मसाला आणि तिखट घालून पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावेत.

  • सगळ्यात शेवटी यामध्ये स्वच्छ धुऊन कापून घेतलेले स्क्विड घालावेत.

  • वाटीभर पाणी घालून स्क्विड शिजू द्यावेत.

  • सर्व्ह करण्याआधी त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालावी.

  • चपाती, भाकरी, पाव किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार आहे चविष्ट स्क्विड मसाला...

(ही रेसिपी हळदोण्यात राहणाऱ्या मधुरा च्यारी यांनी आपल्यासोबत शेयर केली आहे)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com