Summer Car Care: उन्हाळ्यातही कारला ठेऊ शकता थंड, फक्त करा 'हे' काम

Summer Car Care: कारचे तापमान कमी ठेवले नाही तर कारमध्ये अनेक समस्यांचा धोका वाढतो. तुम्ही पुढील पद्धतीनुसार उन्हाळ्यातही कार थंड ठेऊ शकता.
Summer Car Care:
Summer Car Care:Dainik Gomantak

summer car care keep your car cool in summer

देशात लवकरच उन्हाच्या तीव्र झळा सुरू होणार आहे. या दिवसांमध्ये घर थंड राहण्यासाठी जशी काळजी घेतो तशीच कारची काळजी घेणे गरजेचे आहे. कार थंड ठेवणे खूप गरजेचे असते. कारचे तापमान कमी ठेवले नाही तर कारमध्ये अनेक समस्यांचा धोका वाढतो. तुम्ही पुढील पद्धतीनुसार उन्हाळ्यातही कार थंड ठेऊ शकता.

विंडो शेड्सचा वापर

उन्हाळ्यात कारमध्ये प्रवास करताना विंडो शेड्स वापरल्या गेल्या तर केबिनही लवकर थंड होऊ शकते. परंतु बहुतांश राज्यांमध्ये पोलीस विंडो शेड्स वापरून कारवाई करू शकतात. पण मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना त्यांचा वापर करता येईल.

टायर्सची काळजी घ्या

उन्हाळ्यात टायरची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान टायरचे तापमान खूप वेगाने वाढते. त्यामुळे टायरमध्ये नायट्रोजन वापरण्याचा वापर करावा. नायट्रोजन वापरल्याने उन्हाळ्यातही टायरचे तापमान कमी ठेवता येते.

ग्रीन नेटचा वापर

उन्हाळ्यात कार थंड राहावी यासाठी तुम्ही ग्रीननेटचा वापर करू शकता. तुम्ही पार्किंगमध्ये ग्रीननेट लावू शकता. यामुळे कार जास्त गरम होणार नाही.

सावलीत पार्क करा

उन्हाळ्यातही तुमची कार थंड राहावी असे वाटत असेल तर उन्हात कार पार्क करू नका. कार उन्हात ठेवल्यास आणि कारच्या खिडक्या बंद असल्याने कार खूप वेगाने गरम होते. याशिवाय वाहनाच्या रंगावरही त्याचा वाईट परिणाम होतो.

एसी दुरूस्त करावा

उन्हाळ्यात कार बराच वेळ गरम राहते. पण एसीची योग्य काळजी घेतली तर अशा समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. कारमधला एसी वेळेवर दुरूस्त करावा. एसीमुळे कार थंड राहण्यास मदत होते.

कूलंटची काळजी घ्या

जर तुम्ही कारमध्ये कूलंटची योग्य प्रमाणात काळजी घेतली तर उन्हाळ्यातही कार थंड राहिल. कमी कूलंटमुळे, इंजिनचे सामान्य तापमान राखणे कठीण होते. तुम्ही निष्काळजी राहिल्यास कारचे इंजिनही दीर्घकाळ खराब होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com