'डिप्रेशन' एक अवस्था

आजच्या काळातील युवा पीढी नैराश्याने ग्रासलेली आपल्याला बघायला मिळत आहे. ही नैराश्याची किड वेळीच थांबवली नाही तर त्याचे भयानक परिणाम अपल्याला बघायला मिळतील.
Health Tips : 'डिप्रेशन' एक आवस्था
Health Tips : 'डिप्रेशन' एक आवस्थाDainik Gomantak

आजच्या काळातील युवा पीढी नैराश्याने ग्रासलेली आपल्याला बघायला मिळत आहे. ही नैराश्याची किड वेळीच थांबवली नाही तर त्याचे भयानक परिणाम अपल्याला बघायला मिळतील. एखादा माणुस नैराश्यात आसेल तर आपण त्याला मानसिक रोगीचं लेबल लावून मोकळे होतो.

Health Tips : 'डिप्रेशन' एक आवस्था
तुमच्या या 4 चुकांमुळे फ्रीज होऊ शकतो लवकर खराब

याच कारणामुळे त्या व्यक्तीचं आणखीनच खचीकरण होत रहातं.तर या ऊलट काही लोक कोणत्याही मानसिक समस्येला आजार मानत नाहीत आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे टाळतात. हेच कारण आहे की नैराश्याची समस्या अगदी लहानांपासुन वयोवृद्धांपर्यंत वेगाने पसरत आहे. जेव्हा सतत नकारात्मक आणि स्वत:ला दुखापत करण्याचे विचार येतात तेव्हा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त आपण आपल्या समस्यांबद्दल आपल्या जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलले पाहिजे. नैराश्य ही एक अवस्था आहे. ती कायम स्वरूपी नसुन काही दिवसांनी ती निघुन जाते. पण आपण या गोष्टी कडे चुकीच्या खिडकीतुन बघतो. असे न करता आपण त्या व्याक्तीशी मनमोकळा संवाद साधला पाहीजे.त्या व्यक्तीला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहीजे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे 8,00,000 लोक नैराश्यामुळे आपला जीव गमावतात.

नैराश्याचे कारण

नैराश्यात जाण्याची खुप कारणे आहेत. जसे की वैद्यकीय स्थिती, मादक पदार्थांची सवय,एकटेपणाची भावना, नात्यातील समस्या, आयुष्यात न मिळालेल्या योग्य गोष्टींचा अभाव, नोकरीची समस्या, अर्थिक समस्या ही कारणं असू शकतात तसेच जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू किंवा अचानक जाणं या घटना एखाद्या व्यक्तीला नैराश्यात आणतात.

Health Tips : 'डिप्रेशन' एक आवस्था
या आयुर्वेदिक औषधी वनस्पती पचनसंस्थेला ठेवतात निरोगी

नैराश्याची लक्षणे

नैराश्यामुळे व्यक्तिच्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल सुरू होतात. प्रत्येक वेळी चिंतेत राहणे तसेच असहाय्य वाटणे, चिडचिड होणे,जास्त कंटाळा, लैंगिक इच्छा कमी होणे आणि पूर्ण वेळ डोकेदुखी, झोप कमी होणे किंवा जास्त झोप लागणे, श्वसनक्रियेवर परिणाम होणे, मनात नकारात्मक विचार वाढणे, नैराश्य वाटणे, इतर गोष्टीतील रस कमी होणे,ही नैराश्यची सामान्य लक्षणे आहेत. नैराश्याच्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या मनात अत्माहत्येचे विचार येऊ लागतात.काही प्रकरणांमध्ये हे विचार येतच राहतात परंतु काही प्रकरणांमध्ये हे विचार व्यक्तीवर इतके वर जातात की ते आपला जीव घेतात.

उपचार

नैराश्याग्रस्त व्यक्तीला एकटे सोडु नये. सध्या समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती देखील कोरोणाच्या काळात मानसिक संतुलन गमावत आहेत. या परिस्थितीत नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीसाठी हा काळ एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आणि कुटूंबाशी नेहमी संपर्कात रहा शिवाय समस्यांविषयी चर्चा करा आणि गोष्टी उघडपणे बोलून त्यांच्याकडून मदत घ्या.

एकाकीपणा टाळा त्यासाठी पुस्तके वाचा, व्यायाम करा, चिंतन करा, चांगली झोप घ्या, अल्कोहोल आणि ड्रग्जचे सेवन करणे टाळा. जर आपण नैराश्याच्या समस्येसशी सामना करीत असाल ती गोष्ट आपण कोणाशीही बोलू शकत नसाल, तर या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com