Relationship Tips: फायदे अनेक आहेत म्हणून...पती-पत्नीत भांडण व्हायलाच पाहिजे

पती-पत्नीमधील भांडण वेगळ्या कोनातून पाहिल्यास, त्यांना एकमेकांपासून दूर नेण्याऐवजी जवळ आणतात.
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak

Relationship Tips: पती-पत्नीमधील भांडण म्हणजे नात्यात सर्व काही ठीक नाही असे मानले जाते. भांडणे नेहमीच नकारात्मक दिसत असतात. पण, नकारात्मक वाटणारी ही गोष्ट जोडप्यासाठी खरोखर फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का?

पती-पत्नीमधील भांडण वेगळ्या कोनातून पाहिल्यास, त्यांना एकमेकांपासून दूर नेण्याऐवजी जवळ आणतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण, हे खरं आहे. कसं ते जाणून घेऊया. (Tips For Couples)

तुम्हाला जोडीदाराची काळजी आहे हे दर्शवते

तुमच्या जोडीदाराने काहीतरी सांगितले आणि तुम्हाला ते आवडत नाही? हे असे दर्शविते की, तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार करतो याची तुम्हाला काळजी आहे. जेव्हा आम्हाला काही फरक पडत नाही तेव्हाच आम्ही त्या परिस्थितीत कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्यावर किंवा कृतीवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा त्याची काळजी अधिक असायला हवी.

Relationship Tips
Palmistry : तळहातावरील हे चिन्ह असते खूप शुभ; वयाच्या पस्तीशीनंतर खुलते भाग्य

मनातील गोष्टी समोर येतात

रागावलेला माणूस उघडपणे आपला राग व्यक्त करतो. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, शांतता राखण्यासाठी गोष्टी लपवून ठेवण्याचा जोडप्यांचा कल असतो. मात्र, अशा गोष्टी सुधारण्याऐवजी त्यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम करते. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटत नसेल तर ती तुमच्या जोडीदाराला उघडपणे सांगा, तरच तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

नाते अधिक घट्ट होते, परस्पर विश्वासही वाढतो.

भांडणांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि ते नातेसंबंधात कटुता आणतात असे म्हटले जाते. पण, भांडण जोडप्याला जवळ आणते. गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी, त्याबद्दल बोलले जाते तेव्हा प्रश्न सोडवण्यास मदत होते. नात्यात कटुता येऊ देत नाही.

जोडप्यामध्ये वाद होतात आणि नंतर दोघे मिळून वाद मिटवतात तेव्हा त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. एवढेच नाही तर त्यांच्यातील परस्पर विश्वासही वाढतो. कारण या जोडप्याला सर्वात मोठी भीती असते की भांडण झाले तर त्यांच्यात दुरावा निर्माण होईल.

भांडताना माणसाचे खरे स्वरूप समोर येते. त्याच्या भावनाही बिनधास्तपणे व्यक्त होतात. या गोष्टीमुळे जोडप्याला एकमेकांचे खरे वर्तन समजण्यास मदत होते. यासोबतच ते त्यांच्यातील मतभेदही बाहेर आणते, त्यांना या मतभेदांवर एकत्र काम करण्याची संधी देते. यामुळे नाते मजबूत आणि निरोगी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com