Rashi Bhavishya 30 November: 'या' राशीच्या लोकांवर होणार गुरुची कृपा? वाचा पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 30 November 2023: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Rashi Bhavishya 30 November
Rashi Bhavishya 30 NovemberDainik Gomantak
  • मेष

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. (Daily Horoscope 30 November 2023)

  • वृषभ

पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल.  (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचे निधान ठरेल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. 

  • कर्क

तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. 

  • सिंह

चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.

  • कन्या

आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. 

  • तुळ

डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु, आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. 

  • वृश्चिक

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या मित्राच्या फोन मुळे सायंकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका.

  • धनु

आरोग्य एकदम चोख असेल. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. 

  • मकर

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल.

  • कुंभ

 या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

  • मीन

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com