Pitur paksha 2021: पितृपक्षात या चुका करणे टाळा

पितृ पक्षात पूर्वजांना त्यांच्या आवडत्या वस्तु दिल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
Pitur paksha 2021: पितृपक्षात या चुका करणे टाळा
Pitur paksha 2021: पितृपक्षात या चुका करणे टाळा Dainik Gomantak

पितृ पक्षाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांना त्यांच्या आवडत्या वस्तु दिल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने कुंडलीतील पितृ दोषाची सुटका होते. असे म्हटले जाते की पितृ पक्षाच्या वेळी पूर्वज त्यांच्या कुटुंबांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. चला तर मग जाणून घेवूया या काळात कोणत्या गोष्टी करू नये.

* श्राद्धाच्या वेळी लोखंडी भांडी वापरू नये. असे मानले जाते की लोखंडी भांडी वापरल्याने कुटुंबावर अशुभ परिणाम होतो. या वेळी पितळ, तांबे किंवा इतर धातूपासून बनवलेली भांडी वापरली पाहिजे.

* पितृपक्षात तेलाचा वापर करू नये. तसेच दुसऱ्यांच्या घरातील अन्नाचे सेवन करणे टाळावे. श्राद्धामध्ये लसूण, कांद्याचा वापर टाळावा. या दिवशी ब्रम्हणांना जेवण देणे शुभ मानले जाते.

* पितृ पक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि शांतीसाठी त्यांच्या आत्म्यांची पूजा करतात.

Pitur paksha 2021: पितृपक्षात या चुका करणे टाळा
Ganesh Chaturthi Special 2021: गोंयचो गणपती दर्शन

* पितृ पक्षात पुरुषांनी केस आणि दाढी कापू नये. असे मानले जाते की केस आणि दाढी कापल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते.

* पितृ पक्षात सात्विक आहार घेणे उत्तम. जर तुम्हाला पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तुम्ही पिंडदान करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com