Navratri Astro Tips: माता दुर्गेच्या कृपेसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात करा 'या' गोष्टी

अनेक लोक नवरात्री दरम्यान माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात.
Navratri Astro Tips
Navratri Astro TipsDainik Gomantak

Navratri Astro Tips: देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहत साजरी केली जाते. यंदा १५ ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पुजा केली जाते. अनेक लोक नवरात्री दरम्यान माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात. ज्योतिषशास्त्रानुसार पण काही छोट्या गोष्टी नवरात्री दरम्यान केल्यास माता दुर्गा लवकर प्रसन्न होतात.

नवरात्रीच्या काळात माता दुर्गेची विधीपुर्व पुजा करावी. पूजा-अर्चा करण्यासोबतच माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक प्रकारचे उपायही करतात. पण नवरात्रीच्या 9 दिवसात काही खास नियमांचे पालन केल्याने माता देवी दुर्गा प्रसन्न होते.

स्वच्छता
नवरात्री दरम्यान घरातील स्वच्छतेकडे खास लक्ष द्यावे. माता दुर्गेच्या आगमनापूर्वी योग्य स्वच्छता करावी. तसेच प्रवेशद्वारावर नवरात्री दरम्यान रांगोळी काढावी. घरातील कोणत्याही कोपऱ्यात कचरा लावून ठेऊ नका. रात्री झोपण्यापुर्वी स्वयंपाक घर स्वच्छ करून ठेवावे.

ब्रम्ह मुहुर्तावर उठावे

नवरात्री दरम्यान माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी ब्रम्ह मुहुर्तावर उठावे आणि आंघोळ करावी. सकाळ-संध्याकाळ माता दुर्गेची आरती करावी. माता दुर्गेला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्यास मातेची कायम कृपादृष्टी राहिल.

नवरात्रीमध्ये कन्यापूजेचे महत्त्व

नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्याने घरातील सदस्यांचा प्रगती होते. नवरात्रीत अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तुप किंवा तेल टाकावे. तसेच नवरात्रीत कन्यापुजेलाही खुप महत्व आहे. अष्टमी किंवा नवमीला नऊ मुलींची पुजा करून त्यांना भोजन द्यावे.

मांसाहार आणि मद्यपेय टाळावे

नवरात्री दरम्यान मांसाहार आणि मद्यपेय टाळावे. कारण यामुळे माता दुर्गा नाराज होऊ शकते. तुम्हाला जर माता दुर्गेचा आशीर्वाद हवा असेल तर नऊ दिवस फक्त सात्विक आहाराचे सेवन करावे .

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com