Car Tips: तुम्हीही गाडी कमी चालवत असाल तर कारमध्ये उद्भवू शकतात 'या' समस्या

गाडी जास्त चालवण्याबरोबरच गाडी कमी चालवली तर त्याचेही तोटे होतात.
Car Tips:
Car Tips:Dainik Gomantak

care care tips if you drive your car less then these four problems may rise

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक अनेकदा त्यांच्या कार कमी चालवतात. पण असे केल्याने कारमध्येही अनेक समस्या निर्माण होतात. कार कमी चालवल्यास कोणत्या चार समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

गंज लागण्याचा धोका

कार एकाच ठिकाणी जास्त वेळ उभी राहिल्यास कारला गंज लागण्याचा धोका वाढतो. कारण जेव्हा कार एका ठिकाणी जास्त वेळ उभी केली जाते तेव्हा कारभोवती माती साचते. ही माती गाडीवरही साचू लागते आणि नंतर पाणी टाकल्यावर बराच वेळ ओलावा एकाच ठिकाणी राहतो. एकाच ठिकाणी ओलावा आणि माती असल्याने गंजणे सुरू होते.

बॅटरीवर वाईट परिणाम

जास्त वेळ कार एकाच जागी उभी राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. कारण कार चालू असताना बॅटरी चार्ज होत राहते. पण कार बंद राहिल्यास बॅटरीमधील करंट हळूहळू कमी होऊ लागतो. असे वारंवार घडल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

ब्रेकचे नुकसान

एकाच जागी जास्त वेळ पार्क केलेल्या कारला हँडब्रेक लावल्यानेही कारचे नुकसान होते. कार बराच वेळ उभी असताना हँडब्रेक चालू ठेवल्यास ब्रेक शू मेटलला चिकटतो. असे झाल्यावर ब्रेक शूज खराब होतात आणि मेकॅनिककडे गेल्यावरच गाडी दुरुस्त होते.

टायरचे आयुष्य

जास्त वेळ गाडी वापरली नाही तर गाडीच्या टायरवरही विपरीत परिणाम होतो. गाडी एका जागी जास्त वेळ उभी ठेवल्याने गाडीच्या टायरच्या काही भागांवर जास्त दबाव येतो. याशिवाय गाडीच्या टायरमध्ये असलेली हवाही हळूहळू कमी होऊ लागते. एका ठिकाणी कमी हवा आणि दाबामुळे टायर कोरडे होऊ लागतात. यामुळे टायर खराब होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com