Car Care Tips: कार घरीच धुत असाल तर 'या' गोष्टीचा करा वापर

Car Care Tips: देशातील बहुतेक लोक त्यांच्या कार घरी न धुता सर्विंस सेंटरमध्ये धुतात. पण तुम्ही कार घरी देखील चमकवू शकता. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
Car Care
Car CareDainik Gomantak

car washing tips how to wash your care at home read full story

धुळ, उन आणि पाऊस यामुळे कार अस्वच्छ दिसते. यामुळे अनेक लोक कार सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जातात आणि ती धुवून घेतात. पण काही लोक कार घरीच धुतात. पण त्यांना कारची चमक टिकवून ठेवता येत नाही. अशा वेळी कार नव्यासारखी दिसावी असे वाटत असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

कार शॅम्पू

घरी कार धुताना अनेक लोक सामान्य साबण वापरतात. त्याऐवजी कारसाठी खास बनवलेल्या शॅम्पूने धुतल्यास कार अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छ होते. घरगुती साबणाने कार धुतल्याने पेंट खराब होण्याचा धोका वाढतो. परंतु कार शॅम्पू वापरल्याने रंग खराब होत नाही किंवा कारचे इतर कोणतेही नुकसान होत नाही.

पॉलिश वापरावे

जेव्हाही तम्ही कार घरी धुता, तेव्हा गाडी काही काळ सुकण्यासाठी सोडावी. यानंतर, बाहेरील भागावर चांगल्या क्वॉलिटीचे पॉलिश वापरावे. त्याऐवजी तुम्ही वॅक्स देखील वापरू शकता. पॉलिश किंवा वॅक्स वापरल्याने कारच्या पेंटच्या पृष्ठभागावर एक संरक्षक स्तर तयार होतो. यामुळे कारच्या पेंटला तर संरक्षण मिळतेच, पण जुनीच कार नव्यासारखी चमकते.

सॉफ्ट कापड

घरामध्ये गाडी धुताना कधीही सामान्य कापड वापरू नका. कारण कारच्या पेंटवर हलके ओरखडे दिसतात, जे नंतर खूप वाईट दिसतात. मायक्रोफायबरचे कपडे बाजारात सहज उपलब्ध आहेत. हे कपडे वापरून कार स्वच्छ करावी. कार शाम्पूने धुतल्यानंतर या कापडावे स्वच्छ पुसावी.

स्वच्छ पाणी

घरी कार धुतानां एकच पाणी जास्तवेळ वापरू नका. कार धुताना पाणी खराब झाल्यास बदलावे. नेहमी स्वच्छ आणि भरपुर पाण्याने कार धुवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com