New Tyre: कारसाठी नवीन टायर खरेदी करताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात, प्रवासात होईल सुखकर

New Tyre Tips: तुम्हीही कारसाठी नवे टायर खरेदी करणार असेल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. यामुळे तुमच्या प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.
New Tyre
New TyreDainik Gomantak

car care tips keep these things in mind while buying new tyre for car

कोणत्याही वाहनाला चांगली टायर्स असणे अत्यंत आवश्यक असते. तुम्हाला जर प्रवासात कोणतीही समस्या नको असेल तर वेळोवेळी टायर्सची तपासणी करत करावी. टायर्सचे अलाइनमेंट आणि टायर बदलणे यासारखी कामे वेळेत करावी. जर तुम्ही कारसाठी नवीन टायर्स खरेदी करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

टायरचा आकार

कारची कार्यक्षमता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन टायर्सची निवड करावी. टायरचा आकार साइडवॉलवर लिस्टेड केला जातो. त्यामुळे, तुम्ही टायर्सचा नवीन संच खरेदी करणार असाल, तर सर्वात पहिले टायर्सचा आकार चेक करावा.

मेकॅनिकला दाखवा

कारचे टायर बाहेर काढण्यापूर्वी त्यांची ट्रेड डेप्थ नियमितपणे चेक केले पाहिजे. याशिवाय टायरचा भाग झीजला किंवा कुठे कट झाले आहे का तपासावे. ओइएम(Original equipment manufacturer) ने सुचविलेल्या हवेच्या दाबानुसार टायर पूर्णपणे फुगलेले असावे. जर तुम्हाला समजत नसेल तर एखाद्या व्यावसायिकाकडून ते चेक करून घ्यावे.

मॅन्युफैक्चरिंग डेट

तुम्ही अगदी नवीन दिसणारा टायर विकत घेत असाल तर त्यावर छापलेली मॅन्युफैक्चरिंग डेट चेक करावी. कारचे टायर रबरचे बनलेले असतात, जे काही दिवसांनी खराब होतात. विशेषत: भारतीय हवामानासारख्या उष्ण हवामानात ते अधिक वेगाने खराब होतात. त्यामुळे टायर खरेदी करताना मॅन्युफैक्चरिंग डेट नक्की चेक करावी.

योग्य क्वॉलिटीचा टायर

कारसाठी टायर खरेदी करताना योग्य क्वॉलिटीचा टायर खरेदी करावा. यामुळे प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com