Car Care Tips: हॅंडब्रेकचा अतिवापर टाळा, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

तुमची कार एकाच जागी जास्त वेळ उभी असेल तर हॅंडब्रेक लावू नका. कारण यामुळे कारचे नुकसना होऊ शकते.
Car Care Tips
Car Care TipsDainik Gomantak

Car Care Tips: कार जास्त वेळ उभी करावी लागत असेल तर अनेक गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला नंतर त्रास देऊ शकतो. जर कार जास्त वेळ उभी करावी लागत असेल तर हँडब्रेक का लावू नका हे जाणून घेऊया.

हँडब्रेक म्हणजे काय?

सर्वच कंपन्या कारमध्ये ब्रेक व्यतिरिक्त हँडब्रेक देखील देतात. हे सर्वसाधारणपणे पार्किंगच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरला जातो. जास्त वेळ वापरल्यास गाडीला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते

कसे काम करते

हँडब्रेक ही कोणतीही कार सुरक्षित ठेवण्यासाठी एक सिस्टम आहे. जी खूप महत्वाची आहे. हँडब्रेक कारच्या पुढील आणि मागील दोन्ही ब्रेकला जोडलेले असते. म्हणून, जेव्हा जेव्हा ते कारमध्ये वापरले जाते तेव्हा ते दोन्ही ब्रेक एकाच वेळी लागतात आणि ते प्राथमिक ब्रेकपेक्षा कमी दाब देते.

कधी लावावा हॅंडब्रेक

कार तात्पुरती पार्क केल्यावर या ब्रेकचा वापर करावा. याशिवाय डोंगरावरही हँडब्रेकचा वापर करावा. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही कारमध्ये जास्त वेळ हँडब्रेक वापरत असाल. त्यामुळे ब्रेकचे नुकसान होते.

नुकसान कोणते होते

तज्ज्ञांच्या मते कारमध्ये जास्तवेळ हँडब्रेकचा वापर केल्यास ब्रेक पॅड जॅम होण्याचा धोका वाढतो. एकदा असे झाले की ते अडकते आणि आवश्यकतेनुसार ब्रेक लावले जात नाहीत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावे लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com