Sanguem News : ‘युवा स्वराज’तर्फे कुडचडेत ‘लोककला महोत्सव’

Sanguem News : यानिमित्त १८ रोजी सकाळी फाती विणणे , हार बनवणे ( महिला ) स्पर्धा, अ.गो. दिंडी स्पर्धा ,२० रोजी अ. गो. लोक नृत्य स्पर्धा तर २१ रोजी अ.गो. फुगडी महोत्सव होणार आहे.
Sanguem
SanguemDainik Gomantak

Sanguem News : सांगे, युवा स्वराज स्पोर्ट्‌स अँड कल्चरल क्लब कुडचडेतर्फे ‘लोक कला महोत्सव २०२४’ हा १८ , २०, २१ फेबुवारी रोजी होणार असून या निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १८ रोजी सकाळी फाती विणणे , हार बनवणे ( महिला ) स्पर्धा, अ.गो. दिंडी स्पर्धा ,२० रोजी अ. गो. लोक नृत्य स्पर्धा तर २१ रोजी अ.गो. फुगडी महोत्सव होणार आहे.

अ.गो. फाती बनवणे (महिला), अ. गो. पारंपरिक हार बनवणे (महिला), अखिल गोवा हार बनवणे (महिला) या स्पर्धांसाठी अनुक्रमे रु. १०००, ५००, ३०० व रु. २०० ची तीन उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत.

Sanguem
Goa News: साकोर्डा जंगलात खैराच्‍या झाडांची कत्तल

दिंडी स्पर्धेत अनुक्रमे रु. ३० हजार, २५ हजार, २० हजार तसेच तीन उत्तेजनार्थ ५ हजार व ट्रॉफी इतर वैयक्तिक बक्षिसे आहेत. लोक नृत्य स्पर्धा १५ हजार,१० हजार, ५ हजार, व रु.१५०० ची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. अखिल गोवा फुगडी महोत्सव रु.१५ हजार,१० हजार, ५ हजार, व तीन १५०० रु उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com