वाहत जाणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण
वाहत जाणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राणDainik Gomantak

सावंतवाडी: पाण्यात बुडणाऱ्या युवकांना वाचवायला गेला आणि तोच वाहत गेला

माडखोल धरण परिसरातील थरार; स्थानिकांच्या प्रयत्नातून वाहत जाणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण

सावंतवाडी: माडखोल (Madkhol dam) धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या दोघा युवकांना तेथील स्थानिक नागरिकांकडून वाचविण्यात यश (Rescued) आले. हा प्रकार आज दुपारी 3 वाजता माडखोल धरण परिसरात घडला. यातील घाडी नामक युवक जीवाची मजा करण्यासाठी पोहण्यासाठी आला होता तर तो वाहत जाताना दुसरा युवक त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र तो ही प्रवाहासमोर टिकू शकला नाही. (Youths who drowned in the Madkhol dam area were rescued)

कारिवडे येथील घाडी नामक युवक शनिवारी दुपारी माडखोल येथील धरण परिसरात फिरायला गेला होता. धरणाच्या ओव्हरफ्लो च्या बाजूला असलेल्या सिमेंट बंधाऱ्यालगत पोहत असताना अचानकपणे तो बुडत असल्याचे पाहून तेथेच जवळ असलेल्या एका गोविंद शेटकर नामक युवकाने उडी घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाहाच्या पाण्याबरोबर तोही वाहून गेला. याबाबतची माहिती तहसील कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडून तेथील स्थानिकांना माहिती दिल्यावर प्रशांत सावंत यांच्यासह इतर स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोन्ही युवकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

वाहत जाणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण
डिचोलीतील युवकाने विहिरीत उडी मारून संपविली जीवनयात्रा 

पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्यांना बाहेर काढणे फारच जिकिरीचे बनले होते मात्र या युवकांनी दोरखंडाच्या सहाय्याने स्वतःचा जीव धोक्यात घालत अगदी प्रवाहात जाऊन त्यांना जिवदान दिले. या बचाव कार्यात प्रशांत सावंत यांच्यासह स्थानिक युवक जीवन केसरकर, सुनील केसरकर, कृष्णा राऊळ, शेखर लातये, शुभम केसरकर, आप्पा राऊळ यांनी सहभाग घेतला होता. माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनीही घटनास्थळी दाखल होत मदत कार्यात सहभाग घेतला होता.

दरम्यान, माडखोल धरणात युवक पुढार्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी रेस्क्यू किट सह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस आल्याचे कळताच जीवदान देऊन बाहेर काढलेल्या कारिवडेतील घाडी नामक सदर युवकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस हवालदार भूषण भुवर, सखाराम भोई, सुनील नाईक, होमगार्ड गणेशप्रसाद वेंगुर्लेकर यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, ते पोहोचण्याआधीच सदर युवकाने पलायन केले. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, सदर धरणाकडे जाणारा रस्ता बंद करून त्याबाबतचा फलक ग्रामपंचायतने लावावा, अशा सूचना पोलिसांनी ग्रामपंचायतला केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com