Viral Video: मांडवी पुलावर धोकादायक स्टंट, बस्तोडातील तरुणाच्या आत्महत्येनंतर व्हायरल होतोय व्हिडिओ

मांडवी पुलावर एक तरुण धोकादायक पद्धतीने उभा असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.
Mandovi Viral Video
Mandovi Viral Video

Mandovi Viral Video: उसकई-बस्तोडा (म्हापसा) येथील एका तरुणाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री मांडवी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेला एक दिवस पूर्ण होत असतानाच मांडवी पुलावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

मांडवी पुलावर एक तरुण धोकादायक पद्धतीने उभा असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण जुन्या मांडवी पुलाच्या सुरक्षा भिंतीवर उभा असून, त्याने अंगावर सफेद रंगाचा कपडा घेतला आहे. तर, दुसरा तरुण सुरक्षा भिंतीच्या खाली बसून त्याचा व्हिडिओ करताना दिसत आहे. वाऱ्यामुळे तरुणाच्या अंगावरील सफेद कपडा हवेत हेलकावे खात आहे. त्याचवेळी पुलावरून वाहनांची नेहमीची वर्दळ देखील सुरु आहे.

एका कारचालकाने या व्हिडिओ चित्रित केला असून, सध्या तो एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अनेकांनी या थोकादायक व्हिडिओप्रकरणी प्रशासनाला लक्ष घाण्याची विनंती केली आहे. तसेच, अशा पद्धतीने स्टंट केल्याबद्दल संबधित तरुणावर देखील संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, उसकई-बस्तोडा येथील 27 वर्षीय फारुख या तरुणाने 28 नोव्हेंबर रोजी मांडवी पुलावरून उडी घेऊन जीवन संपवले. पर्वरी व पणजी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्तातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुबियांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com