Bori News : महिलांना सक्षम बनविण्यासाठी विविध योजना : शिरोडकर

Bori News : आवेडे, बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या भव्य मंडपात शिरोडा भाजप मंडळतर्फे आयोजित केलेल्या नारीशक्ती वंदन कार्यकमावेळी ते बोलत होते.
Bori
BoriDainik Gomantak

Bori News :

बोरी, अविरत आणि अविश्रांतपणे काम करून महिला आपल्या कुटुंबाला आधार करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांबाबत वेगळा विचार करून प्रत्येक महिला सक्षम बनण्यासाठी विविध प्रकारच्या विकास योजना आखल्या आहेत.

या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. आवेडे, बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या भव्य मंडपात शिरोडा भाजप मंडळतर्फे आयोजित केलेल्या नारीशक्ती वंदन कार्यकमावेळी ते बोलत होते.

यावेळी शिरोडा जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, बोरी सरपंच डॉमनिक वाज, उपसरपंच रश्‍मी नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमती नाईक, साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश नाईक रायकर, सचिव उमेश नाईक, उपसरपंच रश्‍मी नाईक, अवधूत नाईक, संदेश प्रभुदेसाई, किरण नाईक, जयेश नाईक, विनय बोरकर, शिरोडा भाजप मंडळचे अध्यक्ष सूरज नाईक, डॉ. गौरी शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Bori
Goa Politics: दक्षिण गोव्यासाठी चोडणकरांची मोर्चेबांधणी

याप्रसंगी शिरोडा भाजप मंडळचे सरचिटणीस अवधूत नाईक, डॉमनिक वाज, जि.प. सदस्य नारायण कामत, सरपंच पल्लवी शिरोडकर आदींची महिलांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.

यावेळी सुमित्रा नाईक, शर्मिली नाईक, रमीता नाईक, दीपाली नाईक, मिलन गावकर, कामिनी शिरोडकर, हेजन नाईक यांचा शिरोडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सूरज नाईक यांनी स्वागत केले. सुमती नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ अर्पून स्वागत केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी शिरोडकर यांनी ऋणनिर्देश केला. सुरवातीला बोरी सर्कल पासून आवेडे साईबाबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण स्क्रीनवर दाखवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com