Murder In Nessai: मालमत्तेच्या वादातून पाद्रीभाट-नेसाय येथे महिलेचा खून, 3 तासांत संशयिताला अटक

चाकू हल्ला केल्यानंतर मारिओ फर्नांडिसने घटनास्थळावरुन पळ काढला.
Murder In Nessai
Murder In Nessai

Murder In Nessai: नेसाय पाद्रीभाट येथे मालमत्तेच्या वादातून फ्लोरेंटिना फर्नांडिस (53) या महिलेचा चाकू भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांकडून संशयित मारिओ ओलिव्‍हेरा (34) याला अटक करण्यात आली.

भांडण सोडविण्‍यास गेलेला त्‍यांचा शेजारी जुबेन ओलिव्‍हेरा याच्‍या हाताला चाकूचा वार बसल्‍याने तोही जखमी झाला.

या प्रकरणात मायणा - कुडतरी पोलिसांनी संशयित मारियो याला भादंसंच्‍या 302 (खून) आणि 324 (शस्‍त्राचा वार करुन जखमी करणे) या कलमाखाली अटक केली आहे. हा खून केल्‍यानंतर संशयिताने आपल्‍या आल्‍टो गाडीने पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी मोबाईल लाेकेशनच्‍या सहाय्‍याने त्‍याचा माग काढीत अवघ्‍या तीन तासात त्‍याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेसाय पाद्रीभाट याठिकाणी फ्लोरेंटिना फर्नांडिस व मारिओ ओलिव्‍हेरा हे दोघेही एकमेकांचे शेजारी असून त्‍यांच्‍यात मालमत्तेवरुन वाद होता. काल रात्री त्‍यांच्‍यामध्‍ये पुन्‍हा शाब्दीक वाद सुरु झाला.

सुमारे पावणेअकराच्या दरम्यान याच वादातून संशयित मारिओ फर्नांडिस याने चाकू काढून फ्लोरेंटिना फर्नांडिस हिच्यावर वार केले. मारिओ फर्नांडिस फ्लोरेंटिनावर चाकूने वार करत असताना तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा शेजारी जुबेन याच्‍या हाताला चाकुची दुखापत झाल्‍याने तो जखमी झाला. घटनेनंतर मारिओ याने घटनास्थळावरुन पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या फ्लोरेंटिना हिला इस्पितळात दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत घटनेची माहिती घेतली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासात तीन तासांच्या आतच संशयित मारिओ ओलिव्‍हेरा याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com