मृत्यूपूर्वी केरळच्या संजयसोबत काय घडलं? वडिलांनी सांगितला गोव्याच्या क्लबमधील घटनाक्रम

तरुणाच्या शरीरावर बल प्रयोग झाल्याचे अहवालातून ठळकपणे दिसून आले आहे.
Mystery Of Kerala youth Dead In Goa
Mystery Of Kerala youth Dead In GoaDainik Gomantak

Mystery Of Kerala youth Dead In Goa: दक्षिणेतील केरळ येथून गोव्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या मल्याळी तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर समोर आलेल्या अहवालामुळे या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.

तरुणाच्या शरीरावर बल प्रयोग झाल्याचे अहवालातून ठळकपणे दिसून आले आहे. मृत्यू होण्यापूर्वी तरुणावर हिंसक हल्ला झाला असवा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय (19) 29 डिसेंबर रोजी दोन मित्रांसोबत गोव्यात आला होता. दोन दिवस गोव्यात फिरल्यानंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला संजय अचानक गायब झाला. बेपत्ता झाल्यानंतर संजयचा वागातोर येथे मृतदेह आढळून आला.

संजयचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, बेपत्ता होण्यापूर्वी तो मित्र कृष्णदेव आणि जयकृष्णन (दोघेही 20 वर्ष) यांच्यासोबत एका क्लबमध्ये होता.

संजयच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितले?

संजय मित्र कृष्णदेव आणि जयकृष्णन यांच्यासोबत वागातोर येथील एका डान्स क्लबमध्ये गेला होता. यावेळी काही लोक त्याला ओढत बाजुला ओढत घेऊन गेले. संजयला गंभीर मारहाण करण्यात आली आणि त्याचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. त्यानंतर संजय डान्स क्लबमध्ये दिसला नाही.

मित्रांनी संजय बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. डान्स क्लबमधील त्यांचा व्हिडिओ आम्ही पोलिसांनी दिल्याचे वडीलांनी म्हटले आहे.

संजयचा मृतदेह सापडला त्यावेळी तो कुजलेल्या अवस्थेत होता. गुरुवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कृटुंबियांकडे सोपविण्यात आला. संजयच्या कृटुंबियांनी हत्येचा आरोप केला असून, सखोल तपासाची मागणी केलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com