नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांचे मुरगाव पालिकेत स्वागत

Nandadeep Raut
Nandadeep Raut

मुरगाव
सध्या कोरोना महामारीने संपूर्ण वास्को शहरात थैमान घातले असून गेल्या महिन्यात मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष ते नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली होती. यात नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांचे निधन झाले होते. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना हेडलँड - सडा येथे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सडा येथील कोविड इस्पितळातून त्यांना काही दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले. आज नगराध्यक्ष नंदादीप राऊत पालिकेत आपल्या कार्यालयात परतले असता पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
दरम्यान, आज पालिका सभागृहात पास्कॉल डिसोझा यांना पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तसेच नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी नगराध्यक्ष राऊत यांनी नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com