Weather Impact on Goa:
Weather Impact on Goa:Dainik Gomantak

Weather Impact on Goa: खराब हवामानाचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बसणार फटका; किनाऱ्यांची मोठी धुप...

पर्यावरण अभ्यासकांचे मत

Weather Impact on Goa: गोव्याला खराब हवामानाचा फटका बसत आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पण, खराब हवामानामुळे गोव्याचे किनारेच आकुंचन पावत आहेत.

त्यामुळे खराब हवामानाचा घाव थेट गोव्याच्या इकॉनॉमीवर घाव बसणार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक अभिजित प्रभुदेसाई यांनी मांडले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गोव्याने आपली जमीन गमावली तर समुद्रकिनारे पाण्यात बुडतील. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होईल. गोव्याची अर्थव्यवस्था ज्या पर्यटन क्षेत्रांवर अवलंबून आहे ते आपण गमावू. अर्थव्यवस्था कोलमडली तर आपण काय करणार?

Weather Impact on Goa:
गोव्यातील मंदिरांमध्ये नवीन वर्षापासून लागू होणार ड्रेस कोड; मिनी स्कर्ट, मिडी, शॉर्ट्स, स्लीव्हलेस टॉप, जीन्सवर बंदी

हवामान बदलाचा परिणाम किनारपट्टीच्या राज्यात सहज दिसून येतो आहे. त्यावर उपाययोजना करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल.

प्रभुदेसाई म्हणाले की, हवामान संकट हा एकमेव मुद्दा आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारसाठी हा एकमेव मुद्दा असावा. गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15 टक्के जमीन नष्ट होईल.

त्यामुळे याला प्राधान्य दिले पाहिजे. 15 टक्के जमीन गमावल्यास किनारपट्टीच्या राज्याचे मोठे नुकसान होईल. समुद्र पातळी वाढल्याने किनारपट्टीची धूप होईल. संपूर्ण किनारी भाग प्रभावित होईल.

Weather Impact on Goa:
खुशखबर! गोव्याला मिळाली आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस; मंगळूरू-मडगाव मार्गावर 'या' दिवसापासून धावणार

भूजलाचे पुनर्भरण न केल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. अनेक मुद्दे आहेत. आता पावसाचे स्वरूप बदलले आहे, भविष्यात काय होईल माहीत नाही. प्रकल्पांवर मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी, हा पैसा हवामानातील बदलांवर उपाय करण्यासाठी खर्च केला पाहिजे.

हवामान बदलाचा परिणाम फळांच्या पॅटर्नवरही झाला आहे. काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाला आहे. मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात आहेत. फळे व फुले येण्याची पद्धत बदलत आहे. स्थलांतरित पक्षीही कमी संख्येने येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com