Valpoi News : मोर्ले पाणी शुध्दीकरण प्रकल्पामुळे होंड्यातील पाण्याची समस्या सुटणार : आमदार डॉ. दिव्या राणे

Valpoi News : होंडा येथे महिला मेळाव्याला मोठा प्रतिसाद
Mla Deviya Rane
Mla Deviya Rane Dainik Gomantak

Valpoi News : वाळपई, होंडा पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोर्ले येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन वर्षांमध्ये होंडा पंचायत क्षेत्रातील गावे टँकरमुक्त होणार आहेत.

त्याचप्रमाणे कदंब बसस्थानकाचे नूतनीकरण करून या ठिकाणी वेगवेगळ्याप्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर देतानाच होंडा पंचायत क्षेत्रातील सौंदर्यीकरणाच्या कामाला लवकरच सुरवात केली जाणार आहे. या विकासकामांमुळे होंडाचे रूप बदलणार असल्याचे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

होंडा सुंदरम सभागृहामध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर, महिला मेळाव्याचे संयोजक विनोद शिंदे, भिंरोडा पंचायत सरपंच उदयसिंग राणे, पंच दीपक गावकर, प्रमोद गावडे, रमेश गावकर, कृष्णा गावकर, नीलेश सातार्डेकर, सुमेधा माडकर, सुशांत राणे, पत्रकार उदय सावंत, बी. डी. मोटे, गोविंद गावकर उपस्थित होते.

Mla Deviya Rane
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, आणखी एका मंत्र्याला करावा लागणार मंत्रीपदाचा त्याग

जलसिंचन खाते व पाणीपुरवठा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्ले येथे पाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. दोन वर्षांत काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर होंडा पंचायत क्षेत्रातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.

होंडा पंचायत क्षेत्राच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. नारायणनगर येथील मैदानाच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे, असेही यावेळी आमदार दिव्या राणे यांनी सांगितले.

सरपंच शिवदास माडकर यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित महिलांना सार्वजनिक हळदीकुंकूम करण्यात आला. त्यात महिलांनी आमदारांसोबत सेल्फी तसेच फोटो काढण्याचा आनंद लुटला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com