वेर्णा-वास्को राष्ट्रीय मार्गावर नौदलाने सुशोभीकरण केल्याने नियमांचे उल्लंघन

या सुशोभीकरणावर लवकरच कारवाई होणार, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

वेर्णा ते मुरगाव हार्बर बंदरपर्यत्त राष्ट्रीय महामार्ग अंदाजे 90 टक्के पूर्ण झाला आहे. यातील मुरगाव बंदरात जाणारा महामार्ग काही प्रमाणात अपूर्ण अवस्थेत आहे. वेर्णा ते वास्को मांगोरहील- गांधीनगरपर्यंत पूर्ण झालेल्या राष्ट्रीय मार्गाच्या बाजूस भारतीय नौदलाने सुशोभीकरण चक्क महामार्गाच्या एकदम जवळ केल्याने राष्ट्रीय मार्गाच्या उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते अवजड आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी नाराजी व्यक्त केली होती.

Goa News
राज्यात केवळ 166 मसाज पार्लरचीच नोंदणी!

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय मार्गाच्या बाजूस येणाऱे सर्व अडथळे दूर करून वेर्णा ते मुरगाव पर्यत्त महामार्ग बनविला असून नौदलाने राष्ट्रीय मार्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने या सुशोभीकरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. या सुशोभीकरणावर लवकरच कारवाई होणार, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

केंद्रीय रस्ते अवजड आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते वास्को गांधीनगर ते मुरगाव देस्तेरो- तारीवाडा पर्यत्त राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूलाचे लोकर्पण सोहळ्या वेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नजरेस वास्को मांगोरहिल वळणावर भारतीय नौदलाच्या रहिवासी व कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळून जाणाऱ्या महामार्गाच्या बाजूस नौदलाने सुशोभीकरण करून राष्ट्रीय महामार्गाला अडथळा निर्माण केला आहे.

याविषयी मंत्री गडकरी यांनी त्यावेळी आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना सदर सुशोभीकरणावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याप्रकरणी माहिती देण्याचे आदेश जारी केले होते,अशी माहिती प्राप्त झाली आहे.

वास्को मांगोरहील मुख्य वळणावर नौदलाने राष्ट्रीय महामार्गाची परवानगी न घेता आपल्या प्रवेशव्दारा जवळ मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केले आहे. याविषयी लवकरच केंद्रीय रस्ते अवजड आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कारवाई होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गोव्याच्या विकासाला प्राधान्य देऊन राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेतले आहे. मात्र जेव्हा संरक्षण क्षेत्राच्या एका विभागाने महामार्गावर अतिक्रमण केल्याचे त्याच्या नजरेस आले, तेव्हा त्यानी आपली नाराजी उद्रघाटन वेळी आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली होती. यामुळे येत्या काही दिवसात नौदलाच्या सुशोभीकरणावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com